गडचिराेली : तालुक्यातील पाेर्ला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष लता भाेयर यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. कार्यक्रमाला मुख्याध्यापिका विजूताई बागळे, यमू राजकाेंडावार, स्मृती कुडकावार, लता झंजाळ, लीना धात्रक व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित हाेते. मुख्याध्यापिका बागळे यांनी शिवाजी महाराजांचा जन्म व माता जिजाबाई यांचे अतुलनीय योगदान याबाबत मार्गदर्शन केले. येमुताई राजकोंडावर यांनी शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याच्या कार्याविषयी माहिती दिली. लता भोयर यांनी स्वराज्याकरिता शिवाजी महाराजांनी गाजविलेल्या पराक्रमाबाबत मार्गदर्शन केले.
कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे शिवजयंती साजरी
फाेटाे
गडचिराेली : कास्ट्राईब शिक्षक संघटना गडचिरोली यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर मनोगत व्यक्त केले. त्यानंतर संघटनेच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीसंबंधी विचारमंथन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय अध्यक्ष राजकुमार घोडेस्वार हाेते. प्रमुख अतिथी म्हणून केल्सडिन जनबंधू, देवेंद्र डोहणे, चक्रपाणि कन्नाके, डॉ. दिवाकर नारनवरे, राहुल गेडाम, दौलत घोडाम, चंदू रामटेके, सुरेश बांबोळे, पुंडलिक शेंडे, दीपक भैसारे, चुडामणी उंदीरवाडे, मधुकर मेश्राम, विजय बांबोळे, संजय तुमराम, नीलेश कोडापे, दिवाकर भडके मान्यवर उपस्थित होते.
संजीवनी विद्यालय नवेगाव गडचिराेली : येथे १९ फेब्रुवारीला शिवजयंती सामाजिक अंतर ठेवून साजरी करण्यात आली. याप्रसंगी संजीवनी उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एन.के.चुटे, शिक्षक व्ही.ए. ठाकरे,पी.एस. एडलावार, आर.डी.यामावार, व्ही.एन. दडमल, टी. डी. मेश्राम उपस्थित होते. सर्वप्रथम शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी महाराजांच्या जीवन कार्यावर विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.एस. एडलावार तर आभार व्ही.एन. दडमल यांनी मानले.
आम आदमी पार्टी कार्यालयात शिवाजी महाराज जयंती साजरी
गडचिराेली : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आम आदमी पक्षाच्या कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण केला. कार्यक्रमाला जिल्हा सदस्य सुरेश गेडाम, सोसल मीडिया प्रमुख रूपेश सावसाकडे, कालिदास मेश्राम, कार्तिक राऊत, आशीष कुनघाड़कर व इतर कार्यकते उपस्थित होते.
लक्ष्मणपूर येथे शिवजयंती साजरी
चामाेर्शी तालुक्यातील लक्ष्मणपूर येथे सार्वजनिक युवा गणेश मंडळाच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतीय सैन्यातून निवृत्त होऊन आलेले लक्ष्मणपूर येथील अशोक झाडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं.स. उपसभापती वंदना विनोद गौरकार हाेत्या. प्रमुख अतिथी म्हणून भारतीय सैन्यात कार्यरत असलेले प्रशांत कुत्तरमारे, विनोद गौरकार, वामन इजमनकार, कमलेश आवारी, प्रदीप निखाडे, पाेलीस पाटील सुरेश चोखारे, उपसरपंच किशोर खामनकर, दादाजी निखाडे, दादाजी बल्की, आनंदराव गौरकार व सार्वजनिक युवा गणेश मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते. अशाेक झाडे यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक विनोद गौरकार, सूत्रसंचालन महेंद्र डाहुले तर आभार विशाल गौरकार यांनी मानले.
देसाईगजच्या नैनपूर वाॅर्डात शिवाजी महाराज जयंती साजरी
देसाईगंज : नैनपूर वाॅर्डातील जगदंबा ग्रुपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला माजी नगरसेवक अण्णाजी तुपट, गोपाल चाैधरी, नागोराव कवासे, चैतनदास विधाते, सुरेश बुल्ले, प्रशांत राऊत उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमाेर दीपप्रज्ज्वलन व माल्यार्पण करून अभिवादन केले.