शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

सोमय्यांच्या अटकेसाठी शिवसेनेची गडचिराेली व आरमाेरीत निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2022 05:00 IST

गडचिरोलीत जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके यांच्या नेतृत्वात, तर आरमोरी येथे जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी निदर्शने करून सोमय्या यांचा निषेध केला. गडचिरोलीत सोमय्या यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात टाका, अशी मागणी करणारी तक्रार गडचिरोली पोलीस स्टेशनला देण्यात आली. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली / आरमोरी : विक्रांत या युद्धनौकेसाठी जमा केलेला पैसा हा राजभवनात न पोहोचता तो भाजपचे नेते किरीट सोमय्या व त्यांचा मुलगा निल यांनी परस्पर आपल्या निवडणुकीसाठी व बांधकाम व्यवसायात वापरल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल आहे. त्यामुळे त्यांना ताबडतोब अटक करावी, या मागणीसाठी गडचिरोली आणि आरमोरी येथे शिवसेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. गडचिरोलीत जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके यांच्या नेतृत्वात, तर आरमोरी येथे जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी निदर्शने करून सोमय्या यांचा निषेध केला. गडचिरोलीत सोमय्या यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात टाका, अशी मागणी करणारी तक्रार गडचिरोली पोलीस स्टेशनला देण्यात आली. यावेळी वासुदेव शेडमाके  यांच्यासह सहसंपर्क प्रमुख अरविंद कात्रटवार, विलास कोडाप, शहरप्रमुख रामकिरीत यादव, दीपक बारसागडे, राजू कावळे, पप्पी पठाण, अमित यासलवार,  गजानन नैताम, नंदू कुमरे, अखाज शेख, अंकुश कुकावले, हेमंत चव्हाण, पूरब शील, अनुज तलांडे, सचिन राठोड, सागर भांडेकर, आदी अनेक पदाधिकारी व शिवसैनिक हजर होते.

काय आहे प्रकरण? सन २०१३ मध्ये ‘आयएनएस विक्रांत’ ही विमानवाहू युद्धनौका वाचविण्यासाठी किरीट सोमय्या यांनी मोहीम सुरू केली होती. लोकांनीही त्यासाठी सढळ हातांनी मदत केली. त्या रकमेतून ‘आयएनएस विक्रांत’ स्मारक स्वरूपात जतन करण्यासाठी तो निधी राजभवन येथे जमा केला जाणार होता; पण प्रत्यक्षात ती रक्कम राजभवनाला मिळालीच नसल्याचे माहितीच्या अधिकारातून स्पष्ट झाले. हा लोकांच्या देशप्रेमाशी खेळ असल्याने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी तक्रार शेडमाके यांनी गडचिरोली पोलिसांत केली.

आरमोरीत ‘हाय-हाय’चे नारेआरमोरी येथे सोमय्या यांना अटक करा, भाजप सरकार हाय-हाय, असे नारे देऊन परिसर दणाणून सोडण्यात आला. साईमंदिर ते बसस्थानकापर्यंत शिवसैनिक, युवासैनिकांनी निषेध रॅली काढली. या वेळी सुरेंद्रसिह चंदेल यांच्यासह उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम, युवासेनेचे जिल्हाप्रमुख चंदू बेहरे, युवती सेना जिल्हाप्रमुख उमा चंदेल, न.प.चे बांधकाम सभापती सागर मने, रहात सय्यद, पायल तिरंगम, शहरप्रमुख भूषण सातव, लहानुजी पिलारे, विकास प्रधान, नंदू चावला, शैलेश चिटमलवार, फालू इन्काने, अक्षय धकाते, राजू ढोरे, पुरुषोत्तम कामतकर, ईश्वर कराणकर, मोतीलाल लिंगायत, शैलेश ढोरे व बरेच शिवसैनिक उपस्थित होते.

 

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याShiv Senaशिवसेना