शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

झेंडेपार लोह प्रकल्पाची सुनावणी रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 00:20 IST

कोरची तालुक्यातील झेंडेपार येथे लोहप्रकल्प उभारण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देप्रचंड गदारोळ : दुसरी सुनावणी कोरची येथेच घेण्याची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा; नागरिकांमध्ये मतभेद

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरची तालुक्यातील झेंडेपार येथे लोहप्रकल्प उभारण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र याबाबत विविध मतप्रवाह निघल्याने जनसुनावणी रद्द करण्यात आली. पुढील जनसुनावणीची तारीख अजूनपर्यंत निश्चित झाली नाही.कोरची येथील झेंडेपार येथे मोठ्या प्रमाणात लोहखनिज आहे. या ठिकाणी लोहप्रकल्प निर्माण करण्यासाठी स्थानिक नागरिकांची परवानगी असणे आवश्यक आहे. यासाठी जनसुनावणीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्याचे नियोजन प्रशासनाने केले होते. मात्र झेंडेपार परिसरातील नागरिकांना गडचिरोली येथे येणे शक्य नसल्याने कोरची या तालुकास्थळी जनसुनावणी घेण्याबाबतची मागणी सुरूवातीपासून केली जात होती. मात्र प्रशासनाने आपला हट्ट कायम ठेवत गडचिरोली येथेच ३ आॅगस्ट रोजी जनसुनावणी ठेवली. या जनसुनावणीला कोरची तालुक्यातील काही नागरिक उपस्थित झाले. मात्र कोरची येथे जनसुनावणी न ठेवल्याबाबतचा रोष नागरिकांमध्ये दिसून येत होता.शासनाच्या नियमानुसार परिसरातील प्रत्येक नागरिकाचे मत जाणून घेणे आवश्यक असतानाही गडचिरोली येथे का जनसुनावणी ठेवली, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. काही नागरिक लोह खदाणीच्या बाजुने मत नोंदवित होते. तर काही नागरिक लोह खदाणीच्या विरोधात बोलत होते. त्यामुळे जनसुनावणीदरम्यान प्रचंड गदारोळ निर्माण झाला. परिणामी अधिकाºयांना जनसुनावणी रद्द करावी लागली. काही नागरिकांनी पुढील जनसुनावणी कोरची येथेच घेण्याबाबतचे लेखी आश्वासन अधिकाºयांना मागितले. मात्र अधिकाºयांनी लेखी आश्वासन दिले नाही. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाणे यांना विचारणा केली असता, जनसुनावणी रद्द झाली आहे. मात्र पुढील तारीख अजूनपर्यंत ठरली नाही, अशी माहिती दिली आहे.चार सुनावण्यांना विरोधजन सुनावणीसाठी झेंडेपार ग्रामसभेला प्रशासनाने पत्र दिले होते. त्यात अनूज माईन्स अ‍ॅन्ड केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचाच उल्लेख होता. प्रत्यक्षात जनसुनावणी करताना चार कंपन्या होत्या. इतर कंपन्यांबाबत प्रशासनाने स्थानिक नागरिकांना अंधारात ठेवले. याबाबत काही जणांनी विरोध केला असता, त्यांना बाहेर काढले जात होते. बोलण्यासाठी जे तयार होते, त्यांना बोलू दिले जात नव्हते. कोरची येथे जनसुनावणी घेण्याबाबतची मागणी वेळोवेळी करूनही प्रशासनाने याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले. प्रशासनाने व कंपनीने स्थानिक नागरिकांची दिशाभूल केली आहे, असा आरोप लोह प्रकल्प विरोधी कृती समितीच्या पदाधिकाºयांनी केला आहे.