शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

बोकड चोरून नेणाऱ्यांना करपडा येथील गावकºयांनी दिला चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 23:00 IST

गोठ्यात बांधलेला बोकड चोरणाऱ्या तिघा जणांना पकडून करपडा येथील नागरिकांनी चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. सदर घटना सोमवार रात्रीच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देपोलिसांच्या केले स्वाधीन : खांद्यावर ठेवून केली जात होती चोरी

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : गोठ्यात बांधलेला बोकड चोरणाऱ्या तिघा जणांना पकडून करपडा येथील नागरिकांनी चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. सदर घटना सोमवार रात्रीच्या सुमारास घडली.छोटू अरूण बोदेले (२४), हरिदास ऋषी धनकर (२७), केशव गोविंदा कोडप (३६) तिघेही रा. वैरागड असे बोकड चोरणाऱ्या चोरट्यांची नावे आहेत. हे तिघेही एमएच ३३ यू ७८५९ व एमएच ३६ टी ८७८२ या क्रमांकाच्या दुचाकीने करपडा येथे रात्री १२ वाजता सुमारास पोहोचले. दुचाकी गावाबाहेर ठेवून धनराज डोंगरवार यांच्या गोठ्यात बांधलेला बोकड खांद्यावर घेऊन चोरून नेत होते. दरम्यान वीज पंप सुरू करून गावातील शेतकरी महादेव चुधरी व सुनील ताडाम हे घराकडे परत येत होते. बोकड चोरून नेत असल्याचे लक्षात येताच दोघांनीही आरडाओरड केली. बोकड टाकून चोरट्यांनी पळ काढला. मात्र गावकऱ्यांनी तिघांनाही पकडले. याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलीस येईपर्यंत गावकऱ्यांनी तिघांनाही चांगलाच धडा शिकविला. दुचाकी ओळखली जाऊ नये, यासाठी दोन्ही दुचाकीच्या नंबर प्लेटवर चोरट्यांनी शेण लावून ठेवला होता. त्याचबरोबर करपडा येथे जाण्यापूर्वी या चोरट्यांनी एक बोकड चोरून तो आरकबोडी येथे बांधून ठेवला होता.आठ दिवसांपूर्वी वैरागड येथे चोरी झाली. त्याचबरोबर वैरागड व परिसरातील गावांमध्ये बॅटºया, विद्युतपंप, वायर चोरी झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या दृष्टीने पोलिसांनी तपास करणे गरजेचे आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरिक्षक अजित राठोड यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार भिमराव बारसागडे, सुमीत बरडे करीत आहेत.