शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

शार्पशुटरची पथके पुन्हा आरमोरीत येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2017 00:40 IST

गेल्या दोन महिन्यांपासून वडसा वन विभागांतर्गत येणाऱ्या कुनघाडा रवी, अरसोडा, कासवी परिसरात नरभक्षक पट्टेदार वाघाची दहशत कायम आहे.

आता तरी होणार काय तो नरभक्षक वाघ जेरबंद? : उपवनसंरक्षकांनी केली पथकाची मागणीविलास चिलबुले । लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : गेल्या दोन महिन्यांपासून वडसा वन विभागांतर्गत येणाऱ्या कुनघाडा रवी, अरसोडा, कासवी परिसरात नरभक्षक पट्टेदार वाघाची दहशत कायम आहे. सदर वाघाने दोन बळीही घेतले आहेत. शार्प शुटरचे दोन पथके ३० मे रोजी आरमोरी येथे दाखल झाली होती. दोन दिवस या पथकाने वाघाला जेरबंद करण्यासाठी शोधमोहीम राबविली मात्र वाघ हाती लागला नाही. त्यानंतर शार्प शुटरची पथके ताडोबाला परत गेली. आता पुन्हा वडसाचे उपवनसंरक्षक व्ही. व्ही. होशिंग यांनी शासनाकडे व वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून शार्प शुटरची पथके पाठविण्याची मागणी केली आहे. लवकरच पुन्हा आरमोरीत शार्प शुटरची पथके ताडोबा येथून दाखल होणार आहे. दहशत माजविणाऱ्या नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी वन विभागाने काही दिवसांपूर्वी कोंढाळा व रवी गावालगतच्या जंगल परिसरात पिंजरे लावले होते. मात्र पट्टेदार वाघ पिंजऱ्यात अडकला नाही. त्यामुळे सदर वाघाला गुंगीचे औषध देऊन शार्प शुटरच्या पथकामार्फत या वाघाला जेरबंद करण्यात यावे, अशी मागणी आमदार क्रिष्णा गजबे यांनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या आदेशानुसार शार्प शुटरची दोन पथके ताडोबा येथून आरमोरीत दाखल झाले. शार्प शुटरच्या दोन्ही पथकाने वाघाची शोधमोहीम राबविली. मात्र आठवडा भराचा कालावधी उलटूनही या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यात शार्प शुटरचे पथक व वन विभागाला यश आले नाही. आता पावसाळ्याला सुरूवात झाली असल्याने मृग नक्षत्रात जोरदार पाऊस होण्याची शक्यता असते. त्या नरभक्षक वाघाचा वावर असलेल्या जंगलालगत शेकडो एकर शेतजमीन आहे. या भागातील शेतकऱ्यांचे आता खरीप हंगामाकडे लक्ष लागले आहे. वाघाच्या दहशतीने या भागातील शेतकऱ्यांनी शेतीकडे जाणे केव्हाचेच बंद केले आहे. त्यामुळे आगामी खरीप हंगामात धान व इतर पिकांची लागवड शेतजमिनीत कशी करावी, या विवंचनेत अनेक शेतकरी सापडले आहेत.लोकप्रतिनिधी कमालीचे उदासीनआरमोरी हे राजकीय सत्ता केंद्र व घडामोडीचे महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. या विधानसभा क्षेत्रात विविध पक्षांचे अनेक दिग्गज नेते आहेत. मात्र वाघाने बळी घेतलेल्या त्या कुटुंबियांचे सांत्वन करण्याचे सौदार्य काही मोजके नेते सोडले तर इतरांनी दाखविले नाही. वाघाला जेरबंद करण्याच्या मागणीला घेऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले नसल्याचे दिसून येते. वन विभागासोबतच राजकीय पदाधिकारीही या मुद्यावर उदासीन दिसून येत आहेत.नागरिकांना दररोज व्याघ्रदर्शनवन विभागाने त्या नरभक्षक वाघाचे लोकेशन ट्रॅप करण्यासाठी कॅमेरे लावले. शिवाय पिंजऱ्याची व्यवस्था केली. त्यानंतर शार्प शुटर व वन विभागाच्या चमूही तैनात करण्यात आल्या. मात्र हे सारे करूनही वाघ जेरबंद झाला नाही. शार्प शुटरची टीम ताडोबाला परतल्यानंतर वडसा-आरमोरी मार्गावर ये-जा करणाऱ्या प्रवाशांना तसेच या भागातील शेतकऱ्यांना सातत्याने व्याघ्रदर्शन घडत आहे. परिणामी भीती कायम आहे.खासगी वाहतूक बंदच‘त्या’ नरभक्षक वाघाच्या दहशतीमुळे सकाळी व सायंकाळी तसेच रात्रीच्या सुमारास वडसा-आरमोरी मार्गावरून आवागमन करण्यास वाहनधारक तयार नाहीत. केवळ दुपारच्या सुमारास काही मोजके वाहनधारक या मार्गाने प्रवास करतात. महामंडळाची बसफेरी वगळता खासगी वाहतूक पूर्णत: बंद आहे.वाघाला जेरबंद करण्यासाठी ताडोबा येथून शार्प शुटरचे पथक बोलाविण्यात आले होते. पथक दाखल झाले. मात्र विहित मुदतीत वाघ न मिळाल्यामुळे हे पथक ताडोबाला परत गेले. आपण शासन व वरिष्ठ कार्यालयाकडे पत्र व्यवहार करून पुन्हा शार्प शुटरची पथके बोलाविली आहेत. पथके दाखल झाल्यानंतर लवकरच वाघ जेरबंद होईल.-विवेक होशिंग, उपवनसंरक्षक, वन विभाग वडसा