शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

वाघाला जेरबंद न करताच शार्पशूटर माघारी परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2017 02:09 IST

तालुक्यातील रवी, कोंढाळा, मुलूरचक, उसेगाव परिसरात ठाण मांडून आपली दहशत निर्माण केलेल्या वाघाला गुंगीचे इंजेक्शन देऊन

दोन दिवसांची मुदत संपली : वाघ कॅमेऱ्यातच कैद झाला लोकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : तालुक्यातील रवी, कोंढाळा, मुलूरचक, उसेगाव परिसरात ठाण मांडून आपली दहशत निर्माण केलेल्या वाघाला गुंगीचे इंजेक्शन देऊन पकडण्यासाठी ताडोबा येथून दोन पथके बोलविण्यात आली होती. त्यांनी संपूर्ण परिसर छाणून काढला. मात्र वाघाचा थांगपत्ता लागला नाही. शार्प शुटरच्या पथकांना दिलेली दोन दिवसांची मुदत संपल्याने शार्प शुटरचे पथक वाघाला न पकडताच परत गेले आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये आणखी भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोंढाळा व रवी येथील दोन इसमांचा बळी घेतल्यानंतर वाघाला पकडण्यासाठी वन विभागाने पिंजरे लावले. आठ दिवस पिंजरे लावूनही वाघाला जेरबंद करता आले नाही. वनमंत्री व प्रधानसचिवांच्या निर्देशानंतर वाघाला गुंगीचे इंजेक्शन देण्यासाठी ताडोबा येथील १० जणांचा समावेश असलेली दोन पथके रवी परिसरात दाखल झाली. या पथकांना २७ व २८ मे या दोन दिवसांची मुदत देण्यात आली होती. पथकातील कर्मचाऱ्यांनी दोन दिवस जंगलात शोध अभियान राबविले आहे. मात्र वाघाने शार्प शुटरच्या पथकाला हुलकावणी दिली. दोन्ही दिवस पथकाला वाघ न गवसल्याने शार्प शुटरचे पथक मुदत संपल्याने २९ मे रोजी परत गेले. शार्प शुटरला आणखी बोलविण्यासाठी वन विभागाच्या मार्फतीने वन विभागाच्या प्रधान सचिवांची परवानगी घ्यावी लागणार आहे. १५ दिवसांपासून वाघ हुलकावणी देत आहे. त्याचबरोबर शेतीच्या कामांना सुरूवात झाली आहे. अशा स्थितीत वाघाची दहशत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोणत्याही परिस्थिती वाघाला जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे. उसेगाव तलावात मांडले बस्तान २९ मे रोजी शार्प शुटरचे पथक सकाळी परत गेल्यानंतर याच दिवशी नरभक्षक वाघ उसेगाव कॅनलच्या बाजुला असलेल्या तलावात सायंकाळी ५ ते ६ वाजताच्या दरम्यान अंदाजे दोन तास निवांतपणे बसून होता. मात्र याबाबतची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. मात्र शार्प शुटर नसल्याने अधिकारी काहीही करू शकले नाही.