शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

कलादालनातील अव्यवस्था शिगेला

By admin | Updated: August 30, 2014 23:44 IST

मानव विकास मिशनच्या निधीतून २००९ साली पोटेगाव मार्गावर बांधण्यात आलेल्या गोंडवन कलादालनाला मागील पाच वर्षांपासून रंगरंगोटी करण्यात आली नाही. त्याचबरोबर संग्रहालयात ठेवण्यात

गडचिरोली : मानव विकास मिशनच्या निधीतून २००९ साली पोटेगाव मार्गावर बांधण्यात आलेल्या गोंडवन कलादालनाला मागील पाच वर्षांपासून रंगरंगोटी करण्यात आली नाही. त्याचबरोबर संग्रहालयात ठेवण्यात आलेल्या वस्तूंकडेही दुर्लक्ष झाले असल्याने या वस्तूंवर धुळ साचली आहे. मात्र याकडे जिल्हाधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्यातील आदिवासींच्या संस्कृतीची माहिती शहरातील नागरिकांना कळावी, यासाठी पोटेगाव मार्गावर तहसील कार्यालयाच्या बाजुला सुमारे ४० लाख रूपये खर्चुन गोंडवन कलादालन या इमारतीचे बांधकाम करण्यात आले. वरचा मजल्यावर सभागृह बांधण्यात आले आहे. सदर सभागृह भाड्याने दिला जातो तर तळमजल्यावर आदिवासींची संस्कृती दर्शविणाऱ्या वस्तूंचे संग्रहालय तयार करण्यात आले आहे. संग्रहालयातील बहुतांश वस्तूंना काचेच्या सहाय्याने बंद करण्यात आले आहे. सदर संग्रहालय पाहण्यासाठी ५ रूपये तिकीट आकारण्यात येते. मात्र या ठिकाणची चांगली साफसफाई केली जात नसल्याने काच व इतर वस्तूंवर धुळ जमा झाली आहे. मागील पाच वर्षांपासून येथील वस्तू व भिंतींची रंगरंगोटी करण्यात आली नाही. एवढेच नाही तर येथील साफसफाई करण्यासाठी १० रूपयाची झाडूसुद्धा घेऊन दिले जात नाही. परिणामी संग्रहालयातील वस्तू आकर्षक दिसत नसल्याने संग्रहालयाला भेट देणाऱ्यांची संख्या रोडावत चालली आहे. एवढेच नाही तर इमारतीवर लिहिण्यात आलेले गोंडवन कलादालन व गोंडवन संग्रहालय हे नाव सुद्धा मिटण्याच्या मार्गावर आहे. कलादालनाच्या बाजुला किरायाणे देण्यासाठी सुमारे ११ व्यापारी गाळे बांधण्यात आली आहेत. मात्र यापैकी एकही गाळा किरायाणे देण्यात आलेला नाही. गाळ्यांच्या समोर प्लॅस्टिक व कचऱ्याचा खच जमा झाला आहे. गाळ्यांच्या समोर शेड असल्याने पावसाळ्यात मोकाट जनावरांचे रात्री थांबण्याचे ठिकाण बनले आहे. जनावरांच्या मलमुत्राच्या दुर्गंधीचाही त्रास या ठिकाणी येणाऱ्यांना सहन करावा लागत आहे. कलादालनाच्या चारही बाजुने संरक्षक भिंत टाकण्यात आली असली तरी दरवाजा बनविण्यात आला नाही. त्यामुळे रात्रीच्या सुमारास या ठिकाणी येणाऱ्या जनावरांना अडविणे शक्य होत नाही. या इमारतीचे रात्रंदिवस देखभाल ठेवण्यासाठी तिघांची नेमणूक करण्यात आली आहे. या तिघांनाही प्रत्येकी केवळ २ हजार ५०० रूपये एवढेच महिनाभराचे मानधन दिले जाते. किमान वेतन कायद्याच्या बाता करणारे प्रशासन स्वत:च या कायद्याचे उल्लंघन करीत आहे. (नगर प्रतिनिधी)