शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अर्धवट नालीमुळे भूखंडावर सांडपाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 05:01 IST

कन्नमवार नगरात तसेच विवेकानंद नगराच्या बोडीच्या पाळीखाली अनेक नागरिकांचे भूखंड आहेत. या परिसरात अनेकांची घरे आहेत. याच परिसरात विनायक कोडापे यांचा भूखंड आहे. पश्चिम दिशेला दुसऱ्या एका व्यक्तीचा भूखंड आहे. दोन्ही भूखंड रिकामे असल्याने पावसाळ्यात चामोर्शी मार्गावरील शासकीय विज्ञान महाविद्यालयापासून पाणी वाहत येते.

ठळक मुद्देनगर परिषदेला निवेदन : कन्नमवार नगरात शासकीय विज्ञान महाविद्यालयापासून येते पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शहरातील शासकीय विज्ञान महाविद्यालयापासून पावसाचे पाणी कन्नमवार नगरातील वॉर्ड क्रमांक २१ मध्ये वाहत होते. येथे एका ठिकाणी नालीचे अर्धवट बांधकाम झाल्याने मोकळ्या भूखंडामध्ये पावसाचे पाणी व सांडपाणी साचत असल्याने परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे नगर परिषदेने अर्धवट नालीचा उतार विरूद्ध दिशेला वळवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.कन्नमवार नगरात तसेच विवेकानंद नगराच्या बोडीच्या पाळीखाली अनेक नागरिकांचे भूखंड आहेत. या परिसरात अनेकांची घरे आहेत. याच परिसरात विनायक कोडापे यांचा भूखंड आहे. पश्चिम दिशेला दुसऱ्या एका व्यक्तीचा भूखंड आहे. दोन्ही भूखंड रिकामे असल्याने पावसाळ्यात चामोर्शी मार्गावरील शासकीय विज्ञान महाविद्यालयापासून पाणी वाहत येते. सदर पाणी रिकाम्या भूखंडांमध्ये साचते. विशेष म्हणजे, नगर परिषदेमार्फत पश्चिम दिशेला नालीचे बांधकाम करण्यात आले आहे. सदर नाली अर्धवट आहे. याशिवाय नालीचा उतार मोकळ्या भूखंडाच्या दिशेने असल्याने पावसाचे पाणी मोकळ्या भूखंडांमध्ये जमा होते. या परिसरात असणाºया नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. सदर समस्या स्थानिक प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. परंतु ही समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष झाले. नगर परिषदेने बांधलेली नाली अर्धवट असल्याने पाण्याचा निचरा न होता ते मोकळ्या भूखंडांमध्ये साचते. या भागात सांडपाण्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक प्रशासनाने अर्धवट नालीचा उतार विरूद्ध दिशेला वळवून नालीचे बांधकाम करावे, अशी मागणी विनायक कोडापे यांनी नगराध्यक्ष, मुख्याधिकारी तसेच स्थानिक नगर सेवकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.डुकरांचा हैदोसकन्नमवार नगरातील मोकळ्या भूखंडांवर सांडपाण्याची डबकी आहेत. या डबक्यांमध्ये दिवसभर डुकरे व मोकाट जनावरे हैदोस घालतात. परिणामी सांडपाण्याची दुर्गंधी पसरते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर डासांची पैदास होत असून रात्रीच्या सुमारास डासांच्या प्रकोपाला बळी पडावे लागते. विविध कीटकजन्य रोग या भागात पसरण्याची शक्यता आहे.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण