शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सातबाराची साईट अखेर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 01:03 IST

मागील आठ दिवसांपासून बंद असलेली आॅनलाईन सातबारा मिळण्याची साईट सोमवारपासून पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे तलाठ्याकडून शेतकऱ्यांना सातबाराचे वितरण केले जात आहे.

ठळक मुद्दे १० दिवस होती बंद : सोमवारपासून सातबारा मिळण्यास सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील आठ दिवसांपासून बंद असलेली आॅनलाईन सातबारा मिळण्याची साईट सोमवारपासून पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे तलाठ्याकडून शेतकऱ्यांना सातबाराचे वितरण केले जात आहे.पीक कर्ज घेणे, खत खरेदी तसेच इतर कामांसाठी सातबाराची गरज भासते. खरीपाचा हंगाम जवळ आला आहे. त्यामुळे विविध कामांसाठी शेतकऱ्यांकडून सातबाराची मागणी वाढली आहे. अशातच मागील १० दिवस आॅनलाईन सातबाराची साईट बंद होती. त्यामुळे शेतकºयांना सातबारा उपलब्ध होत नव्हता. सातबारासाठी तलाठ्याकडे आलेल्या शेतकऱ्याला निराश होऊन परत जावे लागत होते. सातबारा न मिळाल्याने काही शेतकऱ्यांचे पीक कर्ज मिळण्यासही अडचण निर्माण झाली होती. मात्र आॅनलाईन सातबाराशिवाय पर्याय नसल्याने शेतकरी व तलाठी सुध्दा हैराण झाले होते. सोमवारपासून मात्र सातबाराची साईट सुरू झाली आहे. तलाठ्याचे लॉगीन आयडी टाकल्यानंतर सातबारा उपलब्ध होत आहे. सातबारा मिळवण्यासाठी तलाठ्यांकडे शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत आहे. सातबारा देण्याबरोबरच फेरफार, नमुना ८ अ देण्याचे काम सुध्दा सुरू झाले आहे.आपले सरकार येथून सुध्दा सातबारा उपलब्ध होतो. मात्र सदर साईट अजुनही बंद असल्याने शेतकऱ्यांना घरबसल्या किंवा महाआॅनलाईनच्या सेतू केंद्रातून सातबारा मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. परिणामी शेतकऱ्यांना सातबारासाठी तलाठ्यांकडेच जावे लागत आहे. तलाठ्यांकडून सातबारा उपलब्ध होण्यास सुरूवात झाल्याने शेतकºयांची गैरसोय थांबली आहे. खरीप हंगामापूर्वी विविध कामांसाठी शेतकऱ्यांकडून सर्वाधिक सातबाराची मागणी होते. साईटमध्ये काही बदल करायचा असल्यास तो खरीपाच्या हंगामानंतर करावा. यानंतर खरीप हंंगाम संपेपर्यंत साईट बंद करू नये, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.सेतू केंद्रातील समस्या कायमभूअभिलेख, आपले सरकार या पोर्टलद्वारे आपले सरकार सेवा केंद्र, महाआॅनलाईनच्या सेवा केंद्रावरूनही सातबारा काढता येतो. मात्र सदर पोर्टल अजुनही सुरू झाले नाही. त्यामुळे या पोर्टलवरून सातबारा मिळण्यास अडचण जात आहे. शेतकरी जवळपासच्या केंद्रात जाऊन सातबारा विषयी विचारणा करीत आहेत. मात्र साईट बंद असल्याचे केंद्र चालकांकडून सांगण्यात येत आहे. १५ जूनपर्यंत पीक कर्ज देण्याची मुदत असल्याने शेतकरी वर्ग सातबारासाठी गर्दी करीत आहेत. मात्र त्यांना आल्यापावली परत जावे लागत आहे.