शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सतराशे ज्येष्ठांची नेत्रचिकित्सा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 23:01 IST

चामोर्शी ग्रामीण रूग्णालय, नागपूर येथील महात्मे नेत्रपेढी व नेत्र रूग्णालय, पंडित दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी समारोह समिती व चामोर्शी पत्रकार समितीच्या वतीने नेत्र तपासणी शिबिर....

ठळक मुद्देनि:शुल्क शिबिर : चामोर्शी ग्रामीण रूग्णालय व पंडित दीनदयाल उपाध्याय समितीचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : चामोर्शी ग्रामीण रूग्णालय, नागपूर येथील महात्मे नेत्रपेढी व नेत्र रूग्णालय, पंडित दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी समारोह समिती व चामोर्शी पत्रकार समितीच्या वतीने नेत्र तपासणी शिबिर आ. डॉ. देवराव होळी यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या पटांगणात शुक्रवारी घेण्यात आले. या शिबिरात १ हजार ७०० ज्येष्ठ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली.शिबिराचे उद्घाटन आ. डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जि. प. अध्यक्ष योगिता भांडेकर, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरगंटे, पंडित दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी समारोह समितीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश अर्जुनवार, भाजप तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, विनोद गौरकार, नगरसेवक प्रशांत एग्लोपवार उपस्थित होते.तालुक्यातील वयोवृद्ध नागरिकांना मोफत नेत्र तपासणीचा लाभ घेता यावा म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात महिला व पुरूषांची तपासणी करण्यात आल्याने गरजूंना लाभ मिळाला. यापासून कोणीही वंचित राहणार नाही, असे प्रतिपादन आ. डॉ. देवराव होळी यांनी केले. शिबिरात नागपूर येथील महात्मे नेत्र रूग्णालयाचे डॉ. अरविंद डोंगरवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुकन्या गोरे, अंकित लांजेवार, महेश राहूलवार, आकाश मलकापुरे, विशाल, कमल मडावी तसेच चामोर्शी ग्रामीण रूग्णालयाचे नेत्रतज्ज्ञ चिटकुले यांच्या चमूने १ हजार ७०० ज्येष्ठ नागरिकांची नेत्र चिकित्सा केली. शिबिराचे संचालन रमेश अधिकारी यांनी केले.यशस्वीतेसाठी साईनाथ बुरांडे, माणिक कोहळे, ज्ञानेश्वर कुनघाडकर, राजू चुधरी, नरेश अल्सावार, सुनील सोरते तसेच तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.४०० रूग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवडचामोर्शी येथे शुक्रवारी पार पडलेल्या नि:शुल्क नेत्र तपासणी शिबिरात तज्ज्ञांच्या चमूने १ हजार ७०० ज्येष्ठ नागरिकांची नेत्र चिकित्सा केली. यापैकी ४०० नेत्र रूग्णांची नेत्र शस्त्रक्रियेकरिता निवड झाली आहे. यातील रूग्णांना टप्प्याटप्याने नागपूर येथील महात्मे नेत्र रूग्णालयात शस्त्रक्रियेकरिता पाठविले जाणार आहे. गरीब व गरजू नेत्र रूग्णांना आ. डॉ. देवराव होळी यांच्या पुढाकाराने आयोजित शिबिरामुळे लाभ मिळाला आहे.