शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार प्रकरणात आरोपीस सात वर्षांची शिक्षा

By admin | Updated: July 31, 2015 01:46 IST

गावाकडे जाण्यासाठी कुरखेडा तालुक्यातील नान्ही फाट्यावर बसची वाट बघत असलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला गावी सोडून देतो,

अल्पवयीन मुलगी : बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये झाला कारावासगडचिरोली : गावाकडे जाण्यासाठी कुरखेडा तालुक्यातील नान्ही फाट्यावर बसची वाट बघत असलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला गावी सोडून देतो, असे सांगून तिच्या गावी न सोडता जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीस गुरूवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. धर्मेंद्र कवडू उईके (२४) रा. नान्ही ता. कुरखेडा असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणातील पीडित मुलगी ४ जानेवारी २०१४ रोजी नान्ही फाट्यावर सायंकाळी बसची वाट बघत होती. दरम्यान धर्मेंद्र उईके त्या ठिकाणी आला. त्याने सदर अल्पवयीन मुलीला तुझ्या गावी सोडून देतो, असे आश्वासन दिले. धर्मेंद्रच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मुलगी त्याच्या दुचाकीवर बसली. त्यानंतर धर्मेंद्रने दुचाकी शिरपूर गावाच्या जंगलाच्या मार्गाने नेले. जंगलात नेल्यानंतर तिच्यावर शारीरिक संभोग केला. त्यानंतर त्याने आपल्या मित्राच्या चारचाकी वाहनाने मुलीला ब्रह्मपुरी येथे नेले. मात्र त्या ठिकाणी लॉज उपलब्ध न झाल्याने तिला देसाईगंज येथील हॉटेलमध्ये नेले. हॉटेलमध्ये जेवन केल्यानंतर त्याच रात्री तिला नान्ही येथील धर्मेंद्रच्या मित्राच्या घरी नेले. तिथेही तिच्यावर बलात्कार करण्यात आला. दुसऱ्या दिवशी सकाळी ५ जानेवारी रोजी तिला घरात डांबून ठेवण्यात आले. ५ जानेवारी रोजी आणखी तिच्यावर बळजबरी केली. काही वेळानंतर तिला कुरखेडा येथील श्रीराम वार्डात सोडून देण्यात आले. झालेला सर्व प्रकार अल्पवयीन मुलीने आपल्या वडिलांना सांगितला. त्यानुसार तिच्या वडिलाने ६ जानेवारी कुरखेडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा गुरूवारी निकाल लागला असून अप्पर सत्र न्यायाधीश यू. एम. पदवाड यांनी आरोपी धर्मेंद्र उईके याला सात वर्षांचा सश्रम कारावास व १ हजार ५०० रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सरकारी वकील म्हणून सरीता ताराम यांनी काम पाहिले. (नगर प्रतिनिधी)