शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

सात तालुका क्रीडा संकुल थंडबस्त्यात

By admin | Updated: December 9, 2014 22:50 IST

उद्योन्मुख व प्रतिभावान खेळाडू घडविणे, बालवयात खेळाची आवड निर्माण करणे, राष्ट्रीय व आतंरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण करणे हे राज्याच्या क्रीडा व युवा सेवा संचालनालयाचे धोरण आहे.

दिलीप दहेलकर - गडचिरोलीउद्योन्मुख व प्रतिभावान खेळाडू घडविणे, बालवयात खेळाची आवड निर्माण करणे, राष्ट्रीय व आतंरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण करणे हे राज्याच्या क्रीडा व युवा सेवा संचालनालयाचे धोरण आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्याचा क्रीडा विकास अद्यापही कोसोदूर असल्याचे दिसून येते. याचे मुख्य कारण म्हणजे, क्रिडांगणाचा अभाव. प्रत्येक तालुका ठिकाणी तालुका क्रीडा संकूल उभारणे हे राज्याचे क्रीडा धोरण आहे. मात्र जागेअभावी जिल्ह्यातील ७ तालुका क्रीडा संकूल थंडबस्त्यात असल्याचे वास्तव पुढे आले आहे.क्रीडा विकासाकरीता तालुका हा घटक महत्त्वाचा असून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी विविध खेळाच्या किमान सुविधा निर्माण करण्यासाठी तालुका क्रीडा संकूल उभारण्याची योजना राज्याच्या क्रीडा विभागाच्यावतीने राबविण्यात येते. क्रीडा धोरणानुसार गडचिरोली जिल्ह्यातील बाराही तालुक्याच्या ठिकाणी तालुका क्रीडा संकूल प्रस्तावित आहे. बारापैकी आरमोरी, देसाईगंज, सिरोंचा, आलापल्ली या चार ठिकाणी तालुका क्रीडा संकुलांचे काम अर्ध्यापेक्षा अधिक झाले आहेत. मात्र जागा उपलब्ध होत नसल्याने चामोर्शी, धानोरा, कुरखेडा, एटापल्ली, मुलचेरा, भामरागड, कोरची आदी सात तालुकास्तरावर अद्यापही तालुका क्रीडा संकूल उभारण्यात आले नाही. पूर्वी तालुका क्रीडा संकुलांची योजना २५ लाख रूपयाची होती. मात्र खेळाडूंच्या विकासासाठी राज्य शासनाने २००९ पासून सदर योजना १ कोटीची केली आहे. तालुका क्रीडा संकुलाच्या १ कोटी अनुदानातून १० टक्के रक्कम संकुलाची जागा खरेदी करण्याचे प्रयोजन आहे. गेल्या वर्षभरापासून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने उर्वरित ७ तालुका क्रीडा संकूलासाठी जागा शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तालुका क्रीडा संकुलासाठी कमीतकमी २ हेक्टर आर जागा आवश्यक आहे. जिल्ह्यातील ७ तालुका क्रीडा संकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, असा प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. विशेष म्हणजे, भामरागड, एटापल्ली, कोरची या ठिकाणी तालुका क्रीडा संकूल उभारण्यासाठी सामूहिक वनहक्कांतर्गत जागा उपलब्ध करून देण्यात यावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी व वनविभागाकडे सादर करण्यात आला आहे. यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. धानोरा येथे तालुका क्रीडा संकुलासाठी शासकीय जागा उपलब्ध असून ती क्रीडा विभागाला हस्तांतरीत होणार असल्याची माहिती आहे. तालुका क्रीडा संकुलामध्ये ४० मिटर धावनपथ, इनडोअर गेम हॉल, खो-खो, व्हॉलीबॉल, कबड्डी आदी खेळांची दोन मैदाने, बॉस्केटबॉल, टेनिस, शुटींग रेंज पाणी पुरवठा, ड्रेनेज, विद्युतीकरण व संरक्षण भिंत आदींचा समावेश असून क्रीडा साहित्य असणे आवश्यक आहे. गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली येथे जिल्हा स्टेडीअम, जिल्हा क्रीडा प्रबोधनी आहे. आलापल्ली येथे तालुका क्रीडा संकुलाचे काम सुरू आहे. आरमोरी येथील तालुका क्रीडा संकुलांचे काम ९० टक्के पूर्ण झाले असून देसाईगंज, सिरोंचा या ठिकाणी तालुका क्रीडा संकुलाचे ५० टक्के काम झाले आहे. सदर तालुका क्रीडा संकूल पूर्णत्वास आल्यानंतर साहित्य उपलब्ध होऊन त्या भागातील खेळाडूंना खेळांचा सराव करता येणार आहे. मात्र अन्य सात तालुक्यात अद्यापही तालुका क्रीडा संकुलाची निर्मिती करण्यात आली नाही. त्यामुळे या तालुक्यातील खेळाडूंपुढे सरावासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. पुरेशा सोयी- सुविधा नाहीत. याचा परिणाम जिल्ह्याच्या क्रीडा विकासावर होत आहे. लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यात क्रीडा सुविधांसाठी निधी खेचण्यासाठी प्रयत्न करावा, अशी अपेक्षा खेळाडू व क्रीडाप्रेमी करीत आहेत.