शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली नगर परिषदेतील सात कर्मचाऱ्यांच्या बदल्या

By admin | Updated: June 2, 2017 00:53 IST

गडचिरोली नगर परिषदेंतर्गत कार्यरत असलेल्या सात कर्मचाऱ्यांच्या ३१ मे रोजी बदल्या करण्यात आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेंतर्गत कार्यरत असलेल्या सात कर्मचाऱ्यांच्या ३१ मे रोजी बदल्या करण्यात आल्या आहेत. सदर बदल्या नगर विकास विभागाचे सहायक संचालक यांनी केल्या आहेत. नगर परिषदेत आरोग्य पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेल्या प्रणाली दुधबळे यांची बदली देसाईगंज नगर पालिकेत झाली आहे. संगणक पर्यवेक्षक सुरेश क्षिरसागर यांची बदली देसाईगंज नगर परिषदेत झाली आहे. कनिष्ठ अभियंता सुरेश पुनवटकर यांचे स्थानांतरण वरोरा नगर परिषदेत तर कनिष्ठ अभियंता उमेश शेंडे यांचे स्थानांतरण गोंदिया नगर परिषदेत झाले आहे. कर निरिक्षक सुरेश भांडेकर व शिक्षण विभाग प्रमुख ध्रुपनाथ मेश्राम यांचे मूल येथे तर भांडारपाल रमेश वसंतराव धकाते यांचे ब्रह्मपुरी नगर परिषदेत स्थानांतरण झाले आहे.नगर परिषदेंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय ११ मे रोजी महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने घेतला. त्याची अंमलबजावणी मे महिन्यातच करण्यात आली. यापूर्वी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत नव्हत्या. ३१ मे रोजी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यानंतर १ जून रोजी त्यांचे बदली आॅर्डर मेलच्या सहाय्याने संबंधित नगर परिषदेत पाठविण्यात आले. त्या कर्मचाऱ्यास १ जून रोजी भारमुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गडचिरोली नगर परिषदेत अगोदरच अनेक कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यातही अनुभवी कर्मचाऱ्यांचे इतर ठिकाणी स्थानांतरण झाले असल्याने प्रशासन चालविण्यास चांगलीच कसरत होणार आहे.