शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सात कोटींचा महसूल बुडाला

By admin | Updated: August 30, 2014 01:25 IST

गतवर्षी सप्टेंबर २०१३ मध्ये खनिकर्म विभाग व जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील एकूण ८७ योग्य रेतीघाटाची लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली.

दिलीप दहेलकर गडचिरोलीगतवर्षी सप्टेंबर २०१३ मध्ये खनिकर्म विभाग व जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील एकूण ८७ योग्य रेतीघाटाची लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र खनिकर्म व पर्यावरण विभागाच्या अधिक करामुळे कंत्राटदारांनी रेतीघाटाच्या लिलाव प्रकियेकडे पाठ दाखविली. यामुळे ८७ पैकी केवळ ३१ रेतीघाटाची विक्री झाली. तर ५६ रेतीघाट अविक्रीत राहिले. परिणामी या रेतीघाटातून मिळणारा ६ कोटी ७७ लाख ९१ हजार ६४७ रूपयाचा महसूल बुडाल्याची माहिती उघडकीस आली आहे. यंदा अत्यल्प पावसामुळे अनेक रेतीघाट रिकामेच आहेत.गतवर्षी जिल्ह्यातील रेतीघाटाच्या लिलाव प्रक्रियेसाठी जिल्हा खनिकर्म विभागाने संबंधीत तलाठ्यांकडून प्रस्ताव मागविले. आलेल्या रेतीघाटाच्या प्रस्तावाच्या अनुषंगाने भूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणेमार्फत या रेतीघाटांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. सदर सर्व्हेक्षणाचे काम जिल्हा खनिकर्म अधिकारी, तहसीलदार व मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यावतीने एप्रिल व मे महिन्यात करण्यात आले. त्यानंतर पुन्हा सप्टेंबर महिन्यात रेतीघाटाचे सर्व्हेक्षण करण्यात आले. सर्व्हेक्षणाअंती गडचिरोली, सिरोंचा, अहेरी, आरमोरी, भामरागड, एटापल्ली, कुरखेडा, देसाईगंज, चामोर्शी, मुलचेरा व धानोरा आदी ११ तालुक्यातील ८७ रेतीघाट योग्य दर्शविण्यात आले. या रेतीघाटाची लिलावा प्रक्रिया सप्टेंबर महिन्यात राबविण्यात आली. मात्र कराचा भरणा अधिक करावा लागत असल्याने अनेक रेतीघाट कंत्राटदारांनी या लिलाव प्रक्रियेला पाठ दाखविली. यामुळे केवळ ३१ रेतीघाट लिलावात कंत्राटदारांना विक्री करण्यात आले. या ३१ रेतीघाटाच्या माध्यमातून खनिकर्म विभागाला ३ कोटी ६९ लाख ७७ हजार ६५३ रूपयाचा महसूल मिळाला. रेतीघाटाचे कंत्राट घेण्यासाठी कंत्राटदारांना २ टक्के रक्कम बँक सुरक्षा, १० टक्के व्हॅट , २ टक्के आयकर, २० टक्के सुरक्षा ठेव अनामत रक्कम व ५ हजार रूपयाचे शुल्क भूजल सर्व्हेक्षण विभागाकडे अदा करावे लागते. तसेच प्रशासनाने ठेवलेल्या रेतीघाटाच्या किंमतीची रक्कम शासनाकडे अदा करावी लागते. रेतीघाटाच्या किंमतीपेक्षा २५ ते ३० हजार रूपये अधिकचे अदा करावे लागते.