शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सात कंत्राटी अभियंत्यांना मुदतवाढीची प्रतीक्षा

By admin | Updated: December 30, 2015 01:58 IST

सर्व शिक्षा अभियानांतर्गत गडचिरोली जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत सात कंत्राटी अभियंत्यांच्या सेवेला महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबईच्या कार्यालयामार्फत मुदतवाढ देण्यात आली नाही.

गडचिरोली : सर्व शिक्षा अभियानांतर्गत गडचिरोली जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत सात कंत्राटी अभियंत्यांच्या सेवेला महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबईच्या कार्यालयामार्फत मुदतवाढ देण्यात आली नाही. या अभियंत्याची सेवा समाप्त होण्याच्या मार्गावर असल्याने जिल्हा परिषद शाळांमध्ये सुरू असलेल्या एकूण ५१० कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत गडचिरोली जिल्हा परिषदेच्या वतीने विषयतज्ज्ञ व कंत्राटी अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विषय तज्ज्ञाला ११ महिने कालावधीचा नियुक्ती आदेश दिला जातो. तर अभियंत्यांना वर्षातून दोनदा सहा महिन्याच्या कालावधीचे नियुक्ती आदेश दिले जाते. गडचिरोली जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षा अभियानात कार्यरत सात कनिष्ठ अभियंत्याच्या सेवेची मुदत सप्टेंबर २०१५ अखेर संपलेली आहे. मात्र जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आवश्यकतेनुसार या सात कनिष्ठ अभियंत्यांना कामावर ठेवले आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या वतीने वर्ग खोली, नवीन प्राथमिक शाळेच्या इमारतीचे काम किचन शेड व स्वच्छतागृह मिळून एकूण ३६१ कामे सुरू आहेत. याशिवाय राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत प्रयोगशाळा, वर्गखोलीचे बांधकाम सुरू करण्यात आले असून व मुलींच्या वसतिगृहांचे बांधकाम मंजूर करण्यात आले आहे. मानव विकास कार्यक्रमांतर्गत शाळांचे संरक्षण भिंती व शाळा दुरूस्तीचे मिळून एकूण १४२ कामे सुरू आहेत. अतिरिक्त केंद्र सहाय्य योजनेंतर्गत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय इमारत दुरूस्ती व सोलर सिस्टिमचे काम सुरू आहे. जि.प. अंतर्गत एकूण ५१० कामे सुरू असून निधी समायोजनाचे काम शिल्लक आहे. कंत्राटी अभियंत्यांच्या सेवेला मुदतवाढ न मिळाल्यास यंत्रणेअभावी जि.प. शाळांचे कामे प्रभावित होणार आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)