शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पीएसआयला मारहाण करणाऱ्या सात आरोपींना सश्रम कारावास

By admin | Updated: July 2, 2016 01:40 IST

अटक वारंटची तामिली करण्यासाठी गावात गेलेल्या पोलीस उपनिरीक्षक व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या ...

चार्मोशी: अटक वारंटची तामिली करण्यासाठी गावात गेलेल्या पोलीस उपनिरीक्षक व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या सात आरोपींना चामोर्शीच्या न्यायालयाने शुक्रवारी एक वर्षाचा सश्रम कारावास व प्रत्येकी २ हजार ६०० रूपये दंडाची शिक्षा सुनावली. शिक्षा झालेल्या आरोपींमध्ये गंडर ऊर्फ हरिमोहन हजारी हलधर (३१), मिरीनल विमल सिकदार (३३), जयदेव ओबिला मंडल (६३), गौतम महानंदा मंडल (४१), पप्पू गुरूपद भक्तो (२३), पंकज अर्जुन सरकार (३६), शंकर हजारी हलधर (४२) सर्व रा. सुभाषग्राम ता. चामोर्शी यांचा समावेश आहे. मारहाण केल्यानंतर कुलूपबंद खोलीत ठेवल्याबाबतची तक्रार घोटचे पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांनी चामोर्शी पोलीस ठाण्यात दाखल केली. या प्रकरणाचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी अजीत बोराडे, हेमराजसिंह राजपूत यांनी केला. आरोपींविरोधात त्यांनी दोषारोपपत्र दाखल केले. प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी ध. ज. पाटील यांनी या प्रकरणात एकूण १४ साक्षदारांचे बयान नोंदविले. दोन्ही बाजुकडील वकीलांचा युक्तीवाद ऐकून त्यांनी सातही आरोपींना भादंविचे कलम १४३, १४७, ३३२, ३४२, १८६ व १४९ अन्वये एक वर्षाचा सश्रम कारावास व प्रत्येकी २ हजार ६०० रूपयांचा दंड ठोठावला. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे विशेष सहायक सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. डी. व्ही. दोनाडकर यांनी काम पाहिले. असा घडला प्रकारघोट पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक किरण शिंदे हे दुधकुमार बॅनर्जी यांच्या नावाने निघालेल्या अटक वारंटची तामील करण्यासाठी ४ एप्रिल २०१० रोजी सुभाषग्राम येथे शासकीय वाहनाने कर्मचाऱ्यांसोबत गेले. हरिमोहन हलदर यांच्या घरी गेल्यावर तेथे ग्रा.पं.ची निवडणूक असल्याने आरोपींनी पीएसआय शिंदे व कर्मचारी शेडमाके यांना घेराव करून मारहाण केली. त्यानंतर कुलूप लावून खोलीत बंद केले. तसेच शिंदे यांच्या हातातील बॅनर्जी यांचा अटक वारंट हरिमोहन हलदर याने फाडला.