शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

वीज ग्राहकांच्या तक्रारींचा निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 00:38 IST

महावितरणच्या गडचिरोली उपविभागातर्फे गडचिरोली येथे ३० जुलै रोजी ग्राहक सुसंवाद व तक्रार निवारण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात विजेशी संदर्भातील १३ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.

ठळक मुद्देगडचिरोली येथे मेळावा : १३ वीज ग्राहकांचे समाधान; नवीन योजना व तंत्रज्ञानाची दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महावितरणच्या गडचिरोली उपविभागातर्फे गडचिरोली येथे ३० जुलै रोजी ग्राहक सुसंवाद व तक्रार निवारण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात विजेशी संदर्भातील १३ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने गडचिरोली जिल्ह्यात प्रत्येक तालुकास्तरावर महावितरणमार्फत सुसंवाद व तक्रार निवारण मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. गडचिरोली येथे ३० जुलै रोजी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष योगीता पिपरे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य राम मेश्राम, नगरसेवक प्रमोद पिपरे, अधीक्षक अभियंता अनिल बोरसे, कार्यकारी अभियंता विजय मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.प्राप्त झालेल्या तक्रारींमध्ये बहुतांश तक्रारी या वीज बिलासंदर्भात होत्या. या तक्रारींचे निवारण करण्यात आले. ग्राहकांशी सुसंवाद साधताना अधीक्षक अभियंता अनिल बोरसे यांनी मागील दोन वर्षात महावितरणमध्ये झालेल्या तसेच होत असलेल्या बदलांची व सुधारणांची माहिती दिली. वीज बिल भरण्यासाठी महावितरणतर्फे वॉलेट तयार केले जात आहे. या वॉलेटचा उपयोग करून वीज बिल भरल्यास शारीरिक व मानसिक त्रास वाचण्यास मदत होईल. बँकेत जाण्याची ग्राहकांना गरज पडणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी याचा वापर करावा, असे आवाहन केले.नगराध्यक्षा योगीता पिपरे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. अशा प्रकारचे मेळावे काही महिन्याच्या अंतराने आयोजित करावे, असे आवाहन केले. मेळाव्याला अतिरिक्त कार्यकारी अभियंता एस.डी.सूर्यवंशी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता एस.व्ही.वाशिमकर, कनिष्ठ अभियंता व्ही.पी.जोशी आदी उपस्थित होते.

टॅग्स :mahavitaranमहावितरण