शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलाअभावी ससेहोलपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 00:30 IST

स्थानिक रेल्वे मार्गाच्या स्टेशनवर जाळे वाढविल्याने प्लॅटफार्मची उंची वाढविण्यात आली. त्यामुळे पादचाºयांना सदर रेल्वे स्टेशन पार करणे प्रचंड अडचणीचे ठरत आहे. यावर उपाययोजना म्हणून रेल्वे विभागाने येथील तीनही प्लेटफार्मवर उडाणपुलाची व्यवस्था करण्याची गरज आहे.

ठळक मुद्देवृद्ध नागरिकांची गैरसोय : तीन पूल ओलांडून यावे लागते बाजार परिसरात

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : स्थानिक रेल्वे मार्गाच्या स्टेशनवर जाळे वाढविल्याने प्लॅटफार्मची उंची वाढविण्यात आली. त्यामुळे पादचाºयांना सदर रेल्वे स्टेशन पार करणे प्रचंड अडचणीचे ठरत आहे. यावर उपाययोजना म्हणून रेल्वे विभागाने येथील तीनही प्लेटफार्मवर उडाणपुलाची व्यवस्था करण्याची गरज आहे.देसाईगंज हे शहर गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेल्वेस्टेशन असलेले एकमेव ठिकाण आहे. व्यापार उद्दिम व बाजारपेठे म्हणून प्रसिद्ध आहे. सध्या येथील रेल्वे स्टेशनचा संपूर्ण कायापालट झालेला आहे. मात्र रेल्वेच्या अलिकडे व पलिकडे ये- जा करण्यासाठी प्रवाशी वा पादचाºयांना तीन उडाणपुलावरून अंदाजे तीनशे पायºया चढाव्या लागतात. तसेच उतराव्या लागतात.ब्रिटिशांनी चांदा जिल्हा असताना या भागातील वनसंपदेचे महत्त्व ओळखून रेल्वे आणली. मागील शतकापर्यंत हिचे स्वरूप नॅरो गेज होते. मात्र काळानुरूप रेल्वेचे ब्राडगेजमध्ये रूपांतर झाले. आता संपूर्ण यंत्रणेसह प्लेटफार्म हे अत्याधुनिक झाले आहे. सदर स्टेशनवर रेल्वे मार्गाचे जाळे वाढल्याने प्लेटफार्मची उंची वाढविण्यात आली. त्यामुळे पादचाºयांना रेल्वे स्टेशन पार करणे आता अडचणीचे ठरत आहे. यावर उपाययोजना म्हणून रेल्वे विभागाने येथील तीनही प्लेटफार्मवर उडाणपुलाची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.शाळा, महाविद्यालये, कार्यालये, बाजारात येण्यासाठी दोन उडाणपुलावरून मार्गक्रमण करावे लागते. आबालवृद्धांना त्रास होत आहे. त्यामुळे रेल्वे विभागाने नागरिकांसाठी सरळ एकच उडाणपूल तयार करून बाजार परिसराशी जोडण्यात यावा, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.