शहरं
Join us  
Trending Stories
1
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
2
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
3
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
4
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
5
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
6
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
7
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
8
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
9
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
10
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
11
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
12
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
13
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
14
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
15
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
16
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
17
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
18
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत पळाला; चंद्रपुरातील घटना
19
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
20
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे

सर्व्हर डाऊन, ई-पॉस मशीन ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 06:00 IST

डिसेंबर महिना सुरू झाल्यानंतर स्वस्त धान्य दुकानदारांनी मालाची उचल करून लाभार्थ्यांना धान्य वाटपास सुरूवात केली. गेल्या १० दिवसांपासून ई-पॉस मशीनचा सर्वर डाऊन झाल्यामुळे राशन वितरणाचे काम अत्यल्प वेळ चालत आहे. एका दुकानदाराला दिवसभराची फुरसत करून एक ते दोन ग्राहक करण्यासाठी एक ते दीड तासाचा वेळ लागत आहे. परिणामी दुकानासमोर लाभार्थ्यांची गर्दी होत असते.

ठळक मुद्देलाभार्थ्यांसह दुकानदारही त्रस्त : स्लोे नेटवर्क व लिंक फेलमुळे रेशन वितरणात अडचणी

विलास चिलबुले ।लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : स्वस्त धान्य दुकानामार्फत होणाऱ्या रेशन धान्य वितरण व्यवस्थेत पारदर्शकता यावी या उद्देशाने ई-पॉस या बायोमेट्रिक प्रणालीचा वापर गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरात सुरू आहे. परंतु गडचिरोली जिल्ह्यात ई-पॉस मशीनचे सर्व्हर वारंवार डाऊन होत आहे. तसेच स्लो नेटवर्कमुळे लिंक फेल होऊन रेशन वितरणात अडचणी येत आहेत. परिणामी लाभार्थ्यांसह स्वस्त धान्य दुकानदारही त्रस्त झाले आहेत.डिसेंबर महिना सुरू झाल्यानंतर स्वस्त धान्य दुकानदारांनी मालाची उचल करून लाभार्थ्यांना धान्य वाटपास सुरूवात केली. गेल्या १० दिवसांपासून ई-पॉस मशीनचा सर्वर डाऊन झाल्यामुळे राशन वितरणाचे काम अत्यल्प वेळ चालत आहे. एका दुकानदाराला दिवसभराची फुरसत करून एक ते दोन ग्राहक करण्यासाठी एक ते दीड तासाचा वेळ लागत आहे. परिणामी दुकानासमोर लाभार्थ्यांची गर्दी होत असते.अनेकदा उद्भवणाऱ्या तांत्रिक दोषामुळे लाभार्थ्यांना धान्य वितरणात अडचणी येत असून बऱ्याच ठिकाणी राशन दुकानदार व लाभार्थ्यांमध्ये किरकोळ वाद होत आहेत. गरीब कुटुंबांना पुरेसे अन्न मिळावे, त्यांची उपासमार होऊ नये यासाठी शासनाने अशा गरीब व सर्वसामान्य कुटुंबासाठी स्वस्त दरात राशन उपलब्ध करून देण्याची योजना अंमलात आणली. गरीब कुटुंबांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून दिले जाते.राशन धान्य वितरण व्यवस्थेत वापरण्यात येत असलेल्या ई-पॉस मशीनमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे धान्य वितरणाचे काम जेवढ्या गतीने व्हायला पाहिजे, तसे होताना दिसून येत नाही. परिणामी स्वस्त धान्य दुकानदारांचाही बराच वेळ जात आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन सदर समस्या मार्गी लावावी, अशी मागणी दुकानदारांसह धान्य उचलणाºया लाभार्थ्यांनी केली आहे.ग्राहक व दुकानदारांकडून पंचायत समितीच्या पुरवठा विभागाला यासंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. मात्र ई-पॉॅस मशीनबाबतच्या तांत्रिक समस्या मार्गी लावण्यात आल्या नाही. धान्य वितरण व्यवस्था अधूनमधून बंद पडत आहे. बायोमेट्रिक प्रणालीच्या वापरात सुरूवातीला खूप अडचणी आल्या होत्या.

१,१९६ दुकानात मशीन, वाटपाचे वेळापत्रक ढासळलेगडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात मिळून एकूण १ हजार १९६ इतके स्वस्त धान्य दुकान आहेत. या सर्व दुकानांमध्ये पॉर्इंट आॅफ सेल म्हणजे ई-पॉस मशीन बसविण्यात आल्या आहेत. मात्र अहेरी उपविभागासह दुर्गम भागात तसेच आरमोरी, कुरखेडा तालुक्यात बीएसएनएलसह खासगी कंपन्यांचे नेटवर्क राहत नसल्याने या बायोमेट्रिक प्रणालीत अडचणी येत आहेत. परिणामी काही वेळा आॅफलाईन जुन्या पद्धतीने धान्य वाटप केले जाते.