शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

दोन खटल्यांमध्ये दोघांना शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 06:00 IST

दुसऱ्या प्रकरणात गडचिरोली तालुक्यातील बामणी येथील अमोल ज्ञानेश्वर उंदीरवाडे याने १६ जून २०१७ रोजी फिर्यादीला अश्लिल भाषेत शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीच्या तक्रारीवरून गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरिक्षक संजय सांगळे यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार सुरेश घोडाम यांनी केला.

ठळक मुद्देसंडे अँकर । गडचिरोली न्यायालयाचा निकाल; गोकुलनगर व बामणी येथील आरोपी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दोन वेगवेगळ्या खटल्यांमध्ये दोन आरोपींना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.गडचिरोली येथील गोकुलनगर वार्डातील पवन बालाजी दुर्योधन याने २६ मार्च २०१८ रोजी फिर्यादीने चाकून वार करून दुखापत केली. फिर्यादीने याबाबतची तक्रार केल्यानंतर गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन ठाणेदार दीपरत्न गायकवाड यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार सुनील बेसरकर यांनी तपास करून दोषारोपत्र न्यायालयात दाखल केले. ७ सप्टेंबर रोजी आरोपी विरोधात सबळ पुरावे आढळल्याने प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी एन. पी. वासाडे यांनी आरोपी पवन दुर्योधन याला कलम ३२४ अन्वये दोषी ठरवून दोन वर्षांचा सश्रम कारावास व एक हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा सुनावली. द्रव्य दंड न भरल्यास दोन महिने साध्या कारावासाची शिक्षा व फिर्यादीस चार हजार रुपये भरपाई देण्याचा आदेश सुनावला.सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता महाजन यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार यशवंत मलगाम, कोर्ट मोहरर सुभाष सोरते यांनी काम पाहिले.दुसऱ्या प्रकरणात गडचिरोली तालुक्यातील बामणी येथील अमोल ज्ञानेश्वर उंदीरवाडे याने १६ जून २०१७ रोजी फिर्यादीला अश्लिल भाषेत शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीच्या तक्रारीवरून गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरिक्षक संजय सांगळे यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार सुरेश घोडाम यांनी केला. आरोपीविरोधात दोषारोपपत्र दाखल केले. आरोपीविरोधात न्यायायाला सबळ साक्षपुरावे आढळल्याने ७ सप्टेंबर रोजी आरोपीला न्यायालयाने एक हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा व कोर्ट संपेपर्यंत उभे राहण्याची शिक्षा दिली. दंड न भरल्यास पाच दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा दिली. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता अमर फुलझेले यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार यशवंत मलगाम, कोर्ट मोहरर सुभाष सोरते यांनी जबाबदारी सांभाळली.आरोपींमध्ये दहशतमागील दोन वर्षात खटल्यांचे निकाल लागण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच आरोपींना शिक्षा सुध्दा होत आहे. त्यामुळे ज्या आरोपींची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. अशा आरोपींमध्ये दहशत निर्माण झाले आहे. आपल्यालाही शिक्षा होईल, अशी भिती त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे.

टॅग्स :Courtन्यायालय