लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : ३ जानेवारीपासून ज्येष्ठांना बुस्टर डाेस दिला जाणार आहे. याची तयारी आराेग्य विभागाने केली आहे. मात्र, काही ज्येष्ठ नागरिकांनी अजूनपर्यंत पहिलाच डाेस घेतला नाही. त्यांचे काय करायचे, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे. ज्येष्ठांनी पहिला व दुसरा डाेस नियमित वेळेत घेण्याची गरज आहे. काेराेनाचा नवीन व्हेरिएंट असलेल्या ओमायक्राॅन या विषाणूने जगात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे भारत सरकार सतर्क झाले आहे. ज्येष्ठांना या विषाणूपासून धाेका हाेऊ नये, यासाठी बुस्टर डाेस देण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, ज्येष्ठ नागरिक काेराेना प्रतिबंधात्मक लस घेण्यास अतिशय मागे असल्याचे दिसून येते. काेराेनाला प्रतिबंध घालण्यासाठी प्रत्येकाने लस घेणे आवश्यक आहे.
वाहनांमुळे लसीकरणाची गती वाढली
प्रत्येक गावात जाऊन नागरिकांना लस देण्यासाठी आराेग्य विभागाला शासनाने वाहने उपलब्ध करून दिली आहेत. या वाहनांच्या मदतीने आराेग्य कर्मचारी प्रत्येक गावी, तसेच घराची भेट घेऊन लसीकरण करीत आहेत. त्यामुळे लसीकरणाची गती वाढली आहे. मात्र दुर्गम भागात अजुनही काही नागरिक लस घेण्यास तयार नाही.
७० हजार ज्येष्ठांना बुस्टर डाेसज्यांनी दाेन्ही डाेस घेतले आहेत, त्यांनाच बुस्टर डाेस दिला जाणार आहे. गडचिराेली जिल्ह्यात सद्यस्थितीत ९८ हजार ज्येष्ठांनी पहिला डाेस व ६८ हजार ज्येष्ठांनी दुसरा डाेस घेतला आहे. म्हणजे ६८ हजार ज्येष्ठांना बुस्टर डाेस मिळेल. ही आकडेवारी वाढू शकते.
१० हजार हेल्थ वर्करलाही मिळेल बुस्टरगडचिराेली जिल्ह्यात जवळपास १० हजार आराेग्य कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांना सुद्धा बुस्टर डाेस दिला जाणार आहे. काेराेनाचा सर्वाधिक धाेका आराेग्य कर्मचाऱ्यांना राहत असल्याने त्यांना बुस्टर डाेस दिला जाणार आहे. त्यासाठी तयारी सुरू झाली आहे.
मुलांनाही मिळणार डाेस- १५ ते १८ वर्षे वयाेगटातील मुलांना सुद्धा काेराेना लस दिली जाणार आहे. १ जानेवारीपासून काेविड ॲपवर नाव नाेंदणी करता येणार आहे. या वयाेगटातील मुलांना ३ जानेवारीपासून लस दिली जाणार आहे.
आतापर्यंत दिल्या १० लाख ९७ हजार लस- आतापर्यंत जिल्ह्यात पहिली व दुसरी लस मिळून १० लाख ९७ हजार नागरिकांना लस देण्यात आली आहे. ६ लाख ७५ हजार ६९७ नागरिकांना पहिला डाेस तर ४ लाख २१ हजार २३० नागरिकांना दुसरा डाेस देण्यात आला आहे. तालुकास्थळ व जवळच्या गावातील बहुतांश नागरिकांचे लसीकरण झाले आहे. मात्र दुर्गम भागातील नागरिकांनी अजुनही पाठ फिरविली असल्याचे दिसून येते.