शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सक्षमतेसाठी स्वावलंबनाचा मंत्र

By admin | Updated: July 6, 2016 01:45 IST

आपली सक्षमता सिद्ध करण्यासाठी महिलांनी सर्वप्रथम स्वावलंबी होण्यावर भर दिला पाहिजे, महिला बचत गटांनी तळोधी येथे सुरू केलेला

खासदारांचे प्रतिपादन : तळोधीत जैविक खत विक्रीकेंद्राचा शुभारंभ;३०० महिलांना रोजगारचामोर्शी : आपली सक्षमता सिद्ध करण्यासाठी महिलांनी सर्वप्रथम स्वावलंबी होण्यावर भर दिला पाहिजे, महिला बचत गटांनी तळोधी येथे सुरू केलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य असून या उपक्रमासाठी आपण खासदार निधीतून पाच लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून देऊ, असे प्रतिपादन खा. अशोक नेते यांनी केले. आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी सहाय्यित तेजस्वीनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत श्रमसाफल्य लोक संचालित साधन केंद्र तळोधीद्वारा कचरा व्यवस्थापन व खत निर्मिती प्रकल्प सुरू केला असून या केंद्रातील जैविक खत विक्री केंद्राचे उद्घाटन खा. अशोक नेते यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेला कृषी सहसंचालक घोलप, बनसोडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, आत्माचे संचालक पवार, जिल्हा समन्वय अधिकारी कांता मिश्रा, तळोधीच्या सरपंच माधुरी सूरजागडे, उपसरपंच किशोर मांदाडे, श्रमसाफल्य लोकसंचालिक साधन केंद्राच्या अध्यक्ष गीता वैरागडे उपस्थित होत्या. यावेळी मार्गदर्शन करताना खा. अशोक नेते यांनी श्रमसाफल्य लोक संचालित साधन केंद्राने बचत गटातील शेतकरी महिलांकरिता राबविलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. सेंद्रीय पद्धतीने शेती करण्याचे अनेक फायदे आहेत. मात्र अजुनपर्यंत जिल्ह्यातील शेतकरीवर्ग याकडे वळलेला नाही. मात्र जवळच जैैविक खत उपलब्ध झाल्यास शेतकरी या खताचा वापर करेल, जैविक खतामुळे कमी खर्चात शेती केली जाते. त्यामुळे शेतकऱ्याचा लाभ होतो, असे मार्गदर्शन केले. जिल्हा समन्वयक कांता मिश्राम यांनी साधन केंद्राची कार्य करण्याची दिशा स्पष्ट केली. संत गाडगेबाबा कचरा व्यवस्थापन व खत निर्मिती प्रकल्प बचत गटातील महिलांना नेहमी रोजगार उपलब्ध करून देणारा आहे, असे मार्गदर्शन केले. साधन केंद्राच्या सचिव इंदिरा गौरकार यांनी आॅडिट रिपार्टचे वाचन केले तर पौर्णिमा खोब्रागडे यांनी चालू वर्षाचा शाश्वत नियोजन आराखडा प्रस्तूत केला. कार्यक्रमाचे संचालन मोहन धनोटे तर आभार इंदिरा दहेलकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रवीण गडपायले, चारूदत्त वाढई, विक्रम त्रिपदे, दर्शना रामटेके, भारती नांदगावे, यशोदा मामीडवार यांनी सहकार्य केले. या प्रकल्पामुळे ३०० महिलांना रोजगार मिळाला आहे. (प्रतिनिधी)