शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीचा प्रकार पाहून पीकांची निवड करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:28 IST

गडचिरोली : जिल्ह्यातील पूरस्थितीनंतरची पाहणी करताना केंद्रीय पथकाने दुसऱ्याही दिवशी काही गावांना भेटी दिल्या. यावेळी पथकातील सदस्य आणि केंद्रीय ...

गडचिरोली : जिल्ह्यातील पूरस्थितीनंतरची पाहणी करताना केंद्रीय पथकाने दुसऱ्याही दिवशी काही

गावांना भेटी दिल्या. यावेळी पथकातील सदस्य आणि केंद्रीय कृषी मंत्रालयाचे संचालक

आर.पी.सिंग यांनी पीक निवडीबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधला. केवळ धानपीक न घेता जमिनीचा प्रकार, वातावरण पाहून पीकांची निवड करा, असा सल्ला त्यांनी दिला.

धान पिकाबरोबरच गडचिरोली जिल्ह्यात करडई, हरभरा तसेच वटाणा अशा पिकांची निवडही करता येईल, असे सिंग म्हणाले. जिल्ह्यात वेगवेगळ्या तीन पथकांनी कनेरी, पारडी, वसा, पोर्ला, लाडज या पूरबाधित क्षेत्रांची पाहणी केली. कनेरी, पारडी व वसा या भागात शेतकऱ्यांशी संवाद

साधून, झालेल्या नुकसानाबाबत चर्चा केली. शुक्रवारी भेटी दिलेल्या पथकात सिंग यांच्यासह केंद्रीय कार्यालय नागपूरचे अधीक्षक अभियंता महेंन्द्र सहारे, तसेच इतर पथकात रमेशकुमार गंटा, आर.बी.कौल यांचा समावेश होता.

कनेरी या गावात गजानन पाणनकर या शेतकऱ्याशी पथकाने संवाद साधला. त्यांच्या शेतात कापूस पिकाचे नुकसान झाले होते. त्याबाबत सविस्तर माहिती घेवून त्या शेताची पाहणीही पथकाने केली. पारडी या गावातील शोभा बोकडे या शेतकऱ्याच्या पूरबाधित क्षेत्राचीही पाहणी पथकाने केली. गोगाव येथील रस्त्यालगत असलेल्या शेतामधील पूरपरिस्थितीनंतर नव्याने लागण केलेल्या करडई या पिकाची पाहणी करून तेथील शेतकऱ्यांशी

चर्चा केली. शेवटी वसा येथील कुमरे यांच्या शेतीमधील धान कापणीनंतरची परिस्थिती प्रत्यक्ष शेतात जावून पाहिली. यावेळी शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानाची माहिती सदस्यांना सांगितली.

गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट

(फोटो)

केंद्रीय पथकातील सदस्य आर.पी.सिंग यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती गडचिरेाली येथे भेट देवून धान खरेदी प्रक्रिया पाहिली. यावेळी पूरबाधित क्षेत्रातून आलेल्या धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांशीही त्यांनी संवाद साधला. धान खरेदी केंद्रावरील प्रक्रिया जाणून घेत असताना धानाची गुणवत्ता व

शेतकऱ्यांना देण्यात येणारा मोबदला याबाबत पथकातील सदस्यांनी माहिती जाणून घेतली. यावेळी बाजार समितीचे प्रशासक चंद्रशेखर भडांगे व नंदू कुमरे यांनी समितीच्या कामकाजाबाबत माहिती दिली. पथकाबरोबर तहसीलदार महेंद्र गणवीर, कृषी विज्ञान केंद्राचे संचालक डॉ.संदीप कऱ्हाळे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी, सहकार अधिकारी रंधये उपस्थित होते.