शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

सुगंधित तंबाखूसह खºर्याचे साहित्य केले जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 05:01 IST

जिल्ह्यात लपून छापून किराणा दुकानांमध्ये असे पदार्थ विकले जात आहे. हा प्रकार थांबावा यासाठी मुक्तिपथद्वारे गाव संघटनांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. बुधवारी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये दुकानांची तपासणी करून असे साहित्य जप्त करण्यात आले. त्याचबरोबर शासनाच्या आदेशाचे पालन करून आरोग्याला होणारा धोका टाळण्याचे आवाहनही करण्यात आले.

ठळक मुद्देपाच तालुक्यात कारवाई : कोरोनाच्या संचारबंदीत लपून सुरू होती विक्री, मुक्तिपथ व पोलीस पाटलांनी घातला आवर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : खर्रा व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री न करण्याचे आदेश असतानाही नियमांचे उल्लंघन करून विक्री करणाऱ्यांच्या दुकानातील तंबाखूजन्य पदार्थांचे मोठे साठे व खर्रा बनविण्याचे साहित्य मुक्तिपथ गाव संघटन, पोलीस पाटील आणि तालुका चमूने नष्ट केले. ही कारवाई गडचिरोली, चामोर्शी, धानोरा, मुलचेरा आणि भामरागड तालुक्यात करण्यात आली.जिल्ह्यात लपून छापून किराणा दुकानांमध्ये असे पदार्थ विकले जात आहे. हा प्रकार थांबावा यासाठी मुक्तिपथद्वारे गाव संघटनांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. बुधवारी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये दुकानांची तपासणी करून असे साहित्य जप्त करण्यात आले. त्याचबरोबर शासनाच्या आदेशाचे पालन करून आरोग्याला होणारा धोका टाळण्याचे आवाहनही करण्यात आले.मुलचेरा तालुक्यात विजयनगर व कोपरअली चेक येथील किराणा दुकानांची तपासणी केली असता सुगंधित तंबाखू, सुपारी आणि खर्रा बनविण्याचे साहित्य आढळले. हे सर्व साहित्य ताब्यात घेत नष्ट करण्यात आले. दुर्गम अशा भामरागड तालुक्यातील बोटनफुंडी, ताडगाव, कोठी, नारगुंडा, केडमारा या गावातील दुकानांची गाव संघटनेच्या सहकार्याने पाहणी केली असता सुगंधित तंबाखू, खर्रा पन्नी, सुपारी असे साहित्य सापडले. या साहित्याची होळी करण्यात आली. चामोर्शी तालुक्यातील प्रियदर्शिनी या गावी डेली निड्सचे दुकान लावून त्या आड खर्रा विकणाºयाची चौकशी केली. यावेळी मझा तंबाखूचे डबे आणि सुपारी सापडली. हा सर्व मुद्देमाल नष्ट करण्यात आला. त्याचबरोबर धानोरा तालुक्यातील येरकळ, मुरूमगाव, सावरगाव येथे पोलिसांनीच किराणा दुकानांची तपासणी करून तंबाखूजन्य साहित्य न विकण्याची तंबी दिली. बेलगाव आणि जपतलाई येथे सापडलेल्या तंबाखूजन्य साहित्याची मुक्तिपथ चमूने होळी केली. त्याचबरोबर कुरखेडा तालुक्यातील तळेगाव आणि अहेरी तालुक्यातील बोटलाचेरू येथेही साहित्य जप्त करण्यात आले.गडचिरोली तालुक्यातील मारोडा येथील एक इसम पानठेल्याच्या आत बसून बंद दार बंद करून खर्राविक्री करीत असल्याचे गाव संघटना आणि मुक्तिपथ तालुका चमुच्या लक्षात आले. या पानठेल्याची तपासणी केली असता हा इसम मुद्देमालासह खर्रा तयार करताना आढळला. त्याच्याकडील सुगंधित तंबाखूचे सहा डबे, खर्रा पन्नी आणि तब्बल १२ किली सुपारी ताब्यात घेत नष्ट करण्यात आली. कोरोनाच्या संचारबंदीत मुक्तिपथच्या वतीने दारू व तंबाखूविरूद्ध कारवाई होत असली तरी पोलीस व महसूल प्रशासनाकडून ठोस कारवाई होत असल्याचे दिसून येत नाही.कोंढाळा येथे तीन ड्रम मोहसडवा पकडून केला नष्टजमिनीखाली लपवून ठेवलेला तब्बल तीन ड्राम मोहसडवा मुक्तिपथ गाव संघटन आणि कोरोना पथकातील युवांनी शोधून नष्ट केला. बुधवारी कोंढाळा येथे ही अहिंसक कृती झाली. दारूविक्री न करण्याची तंबी गाव संघटनेने विक्रेत्यांना दिली. कोंढाळा येथील मुक्तिपथ गाव संघटन आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या पुढाकाराने दारूविक्री बंदीचा ठराव घेण्यात आला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी येथील युवांचे कोरोना पथकही तयार करण्यात आले आहे. या पथकाने जंगल परिसरात असलेल्या दारूभट्याही यापूर्वीही उद्ध्वस्त केल्या. असे असतांनाही गावातील काही जण दारू गाळून त्याची विक्री करीतच आहे. अशाच काही घरांनी मोहाचा सडवा टाकण्याची माहिती मिळाली. मुक्तिपथ गाव संघटन, तालुका चमू आणि कोरोना पथकातील युवांनी त्यांच्या घराजवळील परिसर खोडून काढला असता तीन ड्राम मोहसडवा सापडला. हा सडवा नष्ट करण्यात आला. मुक्तिपथ गाव संघटनेचे अध्यक्ष नितीन राऊत, सरपंच मंगला शेंडे, पोलीस पाटील किरण कुंभलवार, कोरोना समितीचे दुगेश्वर वारंभे, देवदास नागोसे यांची यावेळी उपस्थिती होते. जिल्ह्यात दारूबंदी असल्याने दारू गाळणे हा गुन्हा आहे. त्यातच सध्या लॉकडाऊन आहे. त्यामुळे दारू गाळणे कायमचे बंद करण्याची तंबी विक्रेत्यांना देण्यात आली.

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदी