शहरं
Join us  
Trending Stories
1
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
4
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
5
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
6
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
7
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
8
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
9
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
10
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
11
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
12
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
13
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
14
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
15
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
16
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
17
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
18
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
19
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
20
कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!

शेतकऱ्यांना बियाणांचे वाटप

By admin | Updated: August 3, 2014 00:06 IST

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागडतर्फे विशेष केंद्रीय सहाय्य योजनेंतर्गत वनहक्क पट्टेधारक अनुसूचित जमातीच्या दारिद्र्यरेषेखालील २२ लाभार्थ्यांना शेती अवजारे, बी-बियाणे व खतांचे

२२ लाभार्थी : भामरागड तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फेभामरागड : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागडतर्फे विशेष केंद्रीय सहाय्य योजनेंतर्गत वनहक्क पट्टेधारक अनुसूचित जमातीच्या दारिद्र्यरेषेखालील २२ लाभार्थ्यांना शेती अवजारे, बी-बियाणे व खतांचे वाटप करण्यात आले.जिल्ह्यातील हजारो नागरिकांना वनहक्क कायदा २००६ अंतर्गत वनपट्ट्यांचे वाटप करण्यात आले आहे. मात्र आजपर्यंत या शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ दिला जात नव्हता. परिणामी कर्ज काढूनच शेती करावी लागत होती. हे सर्व करतांना गरीब शेतकऱ्याची फार मोठी अडचण होत होती. पट्टेधारक शेतकऱ्यांना जमीन दिली. मात्र सदर जमिनीची मशागत करण्यासाठी पैसा व साहित्य नसल्याने शेतकऱ्यांचा विकास रखडला आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागडतर्फे विशेष केंद्रीय सहाय्य योजनेंतर्गत वनहक्क पट्टेधारक अनुसूचित जमातीच्या दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना शेती अवजारे, बी-बियाणे, खते तसेच फळबाग लागवड योजना मंजूर करण्यात आली. या योजनेंतर्गत तालुका कृषी अधिकारी भामरागड यांच्या मार्फतीने भामरागड तालुक्यातील २२ लाभार्थ्यांना बी-बियाणे, खते देण्यात आले. याप्रसंगी सहाय्यक प्रकल्प अधिकारी व्ही. एस. राचेलवार, तालुका कृषी अधिकारी राऊत, विस्तार अधिकारी आत्राम, एल. डी. टांगसेलवार, कृषी पर्यवेक्षक रणदिवे उपस्थित होते. या योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला ५ हजार रूपये मर्यादेपर्यंतचे धानाचे बियाणे, खते यांचा पुरवठा करण्यात आला. पीक लागवडीसाठी सर्वात मोठा खर्च बियाणे व खतांवर होतो. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने खते व बियाणे या दोघांचीही व्यवस्था केल्याने शेतकऱ्यांचा बराच उत्पादन खर्च कमी झाला आहे. भामरागड हा तालुका जिल्ह्यातील सर्वात दुर्गम व अविकसित तालुका म्हणून ओळखल्या जातो. या ठिकाणच्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने सदर शेतकरी महागडे बियाणे व खते खरेदी करू शकत नाही. परिणामी पारंपरिकरितीने शेती करावी लागते. या पद्धतीने शेती केल्यास शेतीचा उत्पादन खर्च कमी होत असला तरी उत्पादनही प्रचंड प्रमाणात घटते. उत्पादन कमी झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत होते. परिणामी दुसऱ्यावर्षीही शेती कसण्यासाठी पैसे राहत नाही, असे दृष्टचक्र निर्माण होते. या दृष्टच्रकातून शेतकऱ्याची सुटका करण्यासाठी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाची मदत अत्यंत मोलाची ठरणार आहे, अशी आशा शेतकरी करीत आहेत. (प्रतिनिधी)