शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 23:10 IST

सर्व वाहनचालकांसह परिवहन विभाग व इतर संबंधितांनी विद्यार्थ्यांची शाळेपर्यंतची वाहतूक सुरक्षितरित्या होण्यासाठी काळजी घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित झाली पाहिजे. त्यासाठी वाहतूक नियमाचे काटेकोर पालन करा, असे निर्देश अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ.हरी बालाजी यांनी दिले.

ठळक मुद्देअतिरिक्त पोलीस अधीक्षकांचे निर्देश : जिल्हा स्कूल बस सुरक्षा समितीची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सर्व वाहनचालकांसह परिवहन विभाग व इतर संबंधितांनी विद्यार्थ्यांची शाळेपर्यंतची वाहतूक सुरक्षितरित्या होण्यासाठी काळजी घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित झाली पाहिजे. त्यासाठी वाहतूक नियमाचे काटेकोर पालन करा, असे निर्देश अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ.हरी बालाजी यांनी दिले.जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीची बैठक १७ जून रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. यावेळी सदर समितीचे अध्यक्ष म्हणून पोलीस अधीक्षकांच्या वतीने अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ.बालाजी बोलत होते. यावेळी बैठकीला प्रामुख्याने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) रमेश उचे, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) मनोहर चलाख व इतर अधिकारी उपस्थित होते.महाराष्टÑ मोटार वाहन (स्कूल बसकरिता विनियम नियम) २०११ चे नियम ५ (२) च्या तरतुदीनुसार प्रत्येक शाळेमध्ये मुख्याध्यापक व प्राचार्य यांच्या अध्यक्षतेखाली स्कूल बस परिवहन समिती गठित करावयाची आहे. तसे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका याचिकेवर निकाल देताना आदेशही दिले आहे. त्यामुळे या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व शाळांनी परिवहन समितीचे गठन करून या समितीच्या नियमित बैठका घ्याव्यात, असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ.बालाजी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले. ही कार्यवाही प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी तसेच नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी करावी, अशा सूचना केल्या.योग्यता प्रमाणपत्र समाप्त झालेल्या स्कूल बसेसची तपासणी करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया स्कूलबसेस व व्हॅनची उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून तपासणी करून घ्यावी. योग्यता प्रमाणपत्र समाप्त झालेल्या स्कूलबसची पुनर्रतपासणी न केल्यास या बसने वाहतूक करता येणार नाही, अशा सूचना देण्यात आल्या. जे स्कूलबस चालक व मालक योग्यता प्रमाणपत्र समाप्त झालेल्या स्कूलबसेसची तपासणी करून नवे प्रमाणपत्र मिळविणार नाही, अशा स्कूल व्हॅन व बसेसवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या.सदर बैठकीत आगामी शैक्षणिक सत्रात शाळेचे अंतर, स्कूलबस व व्हॅनने विद्यार्थ्यांची होणारी वाहतूक, संबंधित शाळांची वाहतुकीसाठीची मान्यता व आरटीओची वाहतुकीला मान्यता आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. याबैठकीला परिवहन, शिक्षण व पोलीस विभागाचे वाहतूक कर्मचारी उपस्थित होते.