शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

'मॅग्नेटिक महाराष्ट्र' परिषदेत कोनसरी लोहप्रकल्पावर शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 01:26 IST

मुंबईत झालेल्या 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' परिषदेत लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीशी राज्य शासनाने करार केल्याने आता कोनसरी येथे होणाऱ्या लोहप्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्देशेकडो बेरोजगारांना रोजगाराची संधी : सहा कोटींचा निधी एमआयडीसीकडे वळता

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मुंबईत झालेल्या 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' परिषदेत लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीशी राज्य शासनाने करार केल्याने आता कोनसरी येथे होणाऱ्या लोहप्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे शेकडो सुशिक्षित बेरोजगारांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारांची संधी उपलब्ध होणार आहे.एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथील पहाडावरील लोहखनिजाची लीज मिळाल्यानंतर लॉयड मेटल्स कंपनीने चामोर्शी तालुक्यातील आष्टीनजीकच्या कोनसरी येथे लोहप्रकल्प उभारण्याची घोषणा केली होती. त्याअनुषंगाने लॉयडने जवळपास ३५ शेतकºयांची सुमारे ५०.२९ हेक्टर शेतजमीन संपादित करुन जमिनीच्या एकूण किमतीच्या १० टक्के रक्कम २६ एप्रिल २०१७ रोजी धनादेशाद्वारे एमआयडीसीला दिली होती. एमआयडीसीने ही रक्कम शेतकºयांना दिली. त्यानंतर १२ मे २०१७ रोजी कोनसरी येथे प्रस्तावित लोहखनिज प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळीही प्रातिनिधीक स्वरुपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकºयांना धनादेश वितरीत करण्यात आले होते. ७ फेब्रुवारी २०१८ रोजी एमआयडीसीने संबंधित शेतकºयांना जमिनीच्या मोबदल्यात रक्कम देण्याविषयीचे पत्र लॉयड मेटल्स कंपनीला दिले. या पत्राची दखल घेत लॉयड मेटल्स कंपनीने ८ फेब्रुवारी २०१८ रोजींं तत्काळ ६ कोटी १ लाख ६९ हजार ८१८ रुपये एमआयडीसीकडे वळते केले.सोमवारी मुंबई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' परिषद झाली. या परिषदेत राज्य सरकार व लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार झाला. याप्रसंगी लॉयड मेटल्सचे मालक राजेश गुप्ता व सरव्यवस्थापक अतुल खाडिलकर उपस्थित होते. या करारावर राज्याच्या उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल व लॉयड मेटल्सचे महाव्यवस्थापक हरिहरण एन.अय्यर यांच्या स्वाक्षºया आहेत. या करारानुसार, लॉयड मेटल्स कंपनी कोनसरी येथे ७०० कोटी रुपयांचा प्रकल्प उभारणार असून, त्यातून सुमारे ८०० सुशिक्षित बेरोजगारांना प्रत्यक्षात रोजगार मिळणार आहे. प्रकल्पाचे पहिल्या टप्प्यातील काम जून २०२० पर्यंत तर, उर्वरित काम २०२७ पर्यंत पूर्ण होणार आहे. यामुळे लवकरच कोनसरी येथील लोहप्रकल्पाच्या कामाला सुरुवात होऊन बेरोजगारांना रोजगारांची संधी मिळेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.