शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कर न भरल्याने जेजानी पेपरमिल सील

By admin | Updated: March 30, 2017 01:46 IST

देसाईगंज नगर पालिकेच्या हद्दीतील बंद स्थितीत असलेला जेजानी पल्स अ‍ॅण्ड पेपर मिल यांच्याकडे

नगर पालिकेची कारवाई : ५८ लाख ८६ हजार ७६८ रूपयांची थकबाकी देसाईगंज : देसाईगंज नगर पालिकेच्या हद्दीतील बंद स्थितीत असलेला जेजानी पल्स अ‍ॅण्ड पेपर मिल यांच्याकडे ५८ लाख ८६ हजार ७६८ रूपयांचा कर सन २००९-१० पासून ते सन २०१६-१७ पर्यंत थकबाकी आहे. त्यामुळे बुधवारी कराच्या वसुलीसाठी मुख्याधिकारी तैमूर मुलानी यांनी पेपरमिलला सील ठोकण्याची कारवाई केली. जेजानी पल्स अ‍ॅण्ड पेपरमिलला कर भरण्याबाबत सूचना देऊनही थकीत मालमत्ता कराचा भरणा न करता ते न्यायालयात गेलेले होते. परंतु न्यायालयाने त्यांच्या विरोधात नगर परिषदेच्या बाजूने निकाल दिलेला आहे. तसेच त्यानंतर सुद्धा सूचना पालिकेच्या वतीने देण्यात आल्या होत्या. याकडेही त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे अखेरीस बुधवारी पेपरमिल सील करण्याची कारवाई करण्यात आली. या जप्ती वसुली मोहिमेत मुख्याधिकारी तैमूर मुलानी, कर निरीक्षक एस. व्ही. नगराळे, अंकुश गायकवाड, विलास दुमाणे, अरविंद इंदुरकर, रवींद्र शेंदरे व पालिकेचे कर्मचारी सहभागी झाले होते. विशेष म्हणजे यापूर्वी नगर परिषद कॉम्प्लेक्समधील गाळे तसेच विविध वॉर्डातील वस्तू जप्त करून नगर परिषद कार्यालयात जमा करण्यात आले आहे. थकबाकीदार मालमत्ता कर धारक तसेच पाणीपट्टी कर धारक यांनी वेळेच्या आत कराचा भरणा न केल्यास यापुढे जप्तीची कारवाई सुरू राहणार असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले आहे. तेव्हा सक्तीची कारवाई व मानहानी टाळण्यासाठी करधारकांनी ३१ मार्चच्या आत कर भरावा, असे आवाहन मुख्याधिकारी मुलानी यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)