शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अकृषक व बांधकाम परवानगीचे अधिकार एसडीओंना

By admin | Updated: February 5, 2017 01:30 IST

नगर पालिका क्षेत्रात होणारी अतिक्रमणे रोखणे आणि मोठ्या प्रमाणावर होणारी अनधिकृत प्लॉटविक्री

जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय : प्लॉट खरेदी, विक्री प्रकरणातील अनियमितता रोखण्यासाठी उपाययोजना गडचिरोली : नगर पालिका क्षेत्रात होणारी अतिक्रमणे रोखणे आणि मोठ्या प्रमाणावर होणारी अनधिकृत प्लॉटविक्री रोखणे व सुनियोजित शहरांचा विकास करण्यासाठी नगरपालिकांसह नव्याने तयार झालेल्या नगरपंचायत क्षेत्रात अकृषक परवानगी सह बाधकाम परवानगी यांचे अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांना प्रदान करण्याचा महत्वपूर्ण निर्णय जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी घेतला आहे. यातील काही अधिकारांचा वापर तहसील स्तरावर योग्य वापर होत नाही असे निदर्शनास आले होते. या स्तरावर विकास नियंत्रण नियमावलीचा आधार घेऊनच अकृषी परवानगी घ्यायची होती. मात्र त्यात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शहरालगत मोठ्या प्रमाणावर बेकायदा प्लॉट विक्री होत आहे. तसेच त्यातून नागरीकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे. बांधकाम परवानगीचाही मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या गैरवापरामुळे शहरालगत अनधिकृत वस्त्यांची वाढ होत आहे. या सर्वांचा नंतर शहरी यंत्रणांवर ताण येतो. पावसाळ्यात अनेक भागात पाण्यात घरे बुडाल्याच्या तक्रारी येतात. परंतु वास्तवात ही बांधकामे मोठ्या प्रमाणावर अनधिकृत आहेत असेही जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. हे सर्व थांबविण्यासाठी या अधिकारात बदल व अधिकार वर्ग करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. १ फेब्रुवारी २०१७ रोजी जिल्हाधिकारी नायक यांनी हा निर्णय एका पत्राव्दारे जाहीर करीत अधिकार वर्ग केले आहेत. यात म्हटले आहे की अकृषक तसेच बांधकाम परवानगी प्रकरणी यापूर्वी नायब तहसीलदार व तहसीलवर यांच्या स्तरावर मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याने नियोजनबध्द विकासाला खिळ बसली आहे. नियोजनबध्द व सुनियोजित विकास होण्यासाठी अकृषक व बांधकाम परवानगीचे अधिकार, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम १३ (१) नुसार वर्ग १ व २ गावांसाठी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रासाठी प्रदान करण्यात येत आहे. प्लॉट खरेदी, विक्री तसेच घर बांधकामाची प्रक्रिया आता गतिमान होणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी) नागरिकांनो, फसवणुकीपासून सावध राहा मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या प्लॉटविक्रीच्या जाहिरातींना भूलून गूंतवणूक करण्यापूर्वी प्लॉट विक्री करणाऱ्यांकडील कागदपत्रांची खातरजमा करुनच गूंतवणूक करावी व होणाऱ्या फसवणूकीपासून सावध रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे या निमित्ताने करण्यात आले आहे.