शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

मूर्त्यांना फासला शेंदूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 22:29 IST

भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाचे मुख्य अभियंता कॅम्पे गौंडा यांनी नुकतीच वैरागड येथील भंडारेश्वर मंदिराला भेट देऊन मंदिराची पाहणी केली. येथील दगडांवर कोरलेल्या मूर्तींचे सौंदर्यीकरण दीर्घकाळ टिकण्यासाठी मूर्त्यांवर पुजेचे साहित्य टाकू नका अशा सूचना दिल्या होत्या.

ठळक मुद्देभंडारेश्वरातील प्रकार : पुरातत्त्व विभागाच्या अटी व नियमांकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाचे मुख्य अभियंता कॅम्पे गौंडा यांनी नुकतीच वैरागड येथील भंडारेश्वर मंदिराला भेट देऊन मंदिराची पाहणी केली. येथील दगडांवर कोरलेल्या मूर्तींचे सौंदर्यीकरण दीर्घकाळ टिकण्यासाठी मूर्त्यांवर पुजेचे साहित्य टाकू नका अशा सूचना दिल्या होत्या. परंतु दौऱ्यानंतरच्या आठ दिवसातच मंदिरातील मूर्त्यांवर शेंदूर फासण्यात आले आहे.कोणत्याही ऐतिहासिक वास्तूची देखभाल करण्याची जबाबदारी पुरातत्त्व विभागाबरोबरच स्थानिक नागरिकांची असते, असे पुरातत्त्व विभागाचे मुख्य अभियंता कॅम्पे गौंडा यांनी स्पष्ट करून मंदिरावर किंवा मंदिर परिसरातील मूर्त्यांचे सौंदर्य दीर्घकाळ कायम राहण्यासाठी कोरीवर मूर्त्यांवर पूजेचे साहित्य टाकण्यास मनाई केली होती. परंतु अशा सूचना देऊन आठ दिवस लोटत नसताना दर्शनासाठी येणाºया भाविकांनी मंदिरातील कोरीव मूर्तीवर तसेच परिसरातील मूर्तीवर शेंदूर फासले. मूर्त्यांवर पूजेचे साहित्य टाकल्याने या साहित्यातील रासायनिक पदार्थांचा विपरित परिणाम होऊन मूर्त्या ठिसूळ होतात. त्यानंतर नष्टही होतात, असे शिल्प तज्ज्ञांचे मत आहे. भंडारेश्वर मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या बोअरवेलचे पाणी अधिक क्षारयुक्त आहे. दर्शनाला येणारे भाविक या बोअरवेलमधील पाण्याचा अभिषेकासाठी वापर करतात. त्यामुळे भंडारेश्वर देवस्थानातील मूर्त्या काळ्या व पिवळ्या पडल्या आहेत.भंडारेश्वर मंदिराची वास्तू पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित येत असून वास्तू संवर्धनासाठी अनेक अटी व नियम आहेत. मंदिरात दर्शनासाठी येणाºया भाविकांनी पुरातत्त्व विभागाने ठरवून दिलेल्या अटी व नियमांचे पालन करावे. मंदिरातील तसेच परिसरातील कोणत्याही मूर्त्यांवर पूजेचे साहित्य टाकू नये. सोबतच क्षारयुक्त पाण्याचा अभिषेकासाठी वापर करू नये. नियमांचे पालन केल्यास वास्तू दीर्घकाळ टिकेल, असे भंडारेश्वर समितीने म्हटले आहे.