शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

धानोरा मार्गाच्या वाहतुकीसाठी भंगार बसगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:31 IST

प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रिदवाक्य असले तरी राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली व अहेरी या दोन्ही आगाराच्या अनेक बसेस भंगार झाल्या असल्याने प्रवासादरम्यान रस्त्यावर बसेसमध्ये बिघाड निर्माण होण्याचे प्रमाण वाढले आहे.

ठळक मुद्देरस्त्यात अनेकदा होतो बिघाड : वायफाय सेवा निकामीच, परिवहन महामंडळाचे कमालीचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रिदवाक्य असले तरी राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली व अहेरी या दोन्ही आगाराच्या अनेक बसेस भंगार झाल्या असल्याने प्रवासादरम्यान रस्त्यावर बसेसमध्ये बिघाड निर्माण होण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबतचा प्रत्यक्ष अनुभव २७ आॅक्टोबर रोजी शुक्रवारला गडचिरोली-धोनारा मार्गावर प्रवाशांना आला.राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली आगाराची गडचिरोली-धानोरा-गडचिरोली ही सायंकाळी ४ वाजता सुटणारी बस धानोरा येथे ५ वाजता पोहोचताच या बसगाडीमध्ये बिघाड निर्माण झाला. परिणामी धानोरावरून गडचिरोलीकडे जाणाºया ३५ ते ४० प्रवाशांना अवैधरित्या सुरू असलेल्या खासगी वाहनांना नाईलाजास्तव प्रवास करावा लागला. सदर बस गडचिरोली येथे पोहोचल्यानंतर चंद्रपूरकडे शेड्युल असल्यामुळे ही बस वेळेवर सुटू शकली नही. त्यामुळे महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. सदर बस चंद्रपूरकरिता गडचिरोली येथून ६.१५ वाजता सुटणार होती. मात्र बिघाड निर्माण झाल्याने ही बस मार्गस्थ करण्यात आली नाही. त्यानंतर एमएच २० डी ९३६३ क्रमांकाची बस धानोरासाठी देण्यात आली. मात्र बसचालकाने सदर बस चालविण्यास नकार दिला. प्रशासनाने हीच बस घेऊन जा, असे सांगितले. सदर बस धानोरा फेरी आटोपल्यानंतर बदलवून देतो, असे चालकाला सांगण्यात आले. विशेष म्हणजे, या बसमध्ये मोहडोंगरीजवळ बिघाड निर्माण झाला. बहुतांश बसगाड्यांची मर्यादा संपली असताना सुध्दा या बसगाड्या मार्गावर वाहतुकीवर ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे महामंडळ प्रवाशांच्या जीवानिशी खेळ करीत आहे, असा आरोप प्रवाशांकडून होत आहे. राज्य परिवहन महामंडळांच्या अनेक बसगाड्यांमध्ये वायफाय इंटरनेट सुविधा असली तरी सेवा कुचकामी ठरली असून साहित्य निकामी ठरले आहेत. विशेष म्हणजे, सदर बसफेरीतील याच बसला यापूर्वी कोटगुल मार्गावरून येत असताना पावसाळ्यात गळती लागली होती. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.ग्रामीण भागातील रस्ते पाहिजे त्या प्रमाणात सुस्थितीत नसल्याने तेथे खासगी वाहन वाहतुकीवर सोडले जात नाही, अशा वेळी प्रवाशांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांना अवलंबून राहावे लागते. मात्र बसगाड्यांच्या देखभालीकडे महामंडळाचे दुर्लक्ष आहे.आसने तुटलेली, तावदानेही दुरवस्थेतराज्य परिवहन महामंडळाच्या बहुतांश बसगाड्यांची आसने तुटलेल्या अवस्थेत आहेत. अनेक बसगाड्यांमधील गादी गायब झाली आहे. शिवाय खिडक्यांचे तावदानेही तुटलेल्या अवस्थेत आहेत. याशिवाय बसगाड्यांची नियमित योग्य प्रकारे स्वच्छता करता येत नाही. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. राज्य परिवहन महामंडळाने गडचिरोली व अहेरी आगारासाठी नव्या चांगल्या प्रकारच्या बसगाड्या उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी प्रवासी मित्र मंडळांनी केली आहे.