शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

विज्ञान प्रदर्शनाचे बक्षीस वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 00:44 IST

पंचायत समिती अंतर्गत तीन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी येथील श्रीराम विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित करण्यात आली. या प्रदर्शनीचा समारोप गुरूवारी करण्यात आला. स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरित करण्यात आले.

ठळक मुद्देकुरखेडात समारोप : विद्यार्थ्यांसह शिक्षकांचाही गौरव

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : पंचायत समिती अंतर्गत तीन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी येथील श्रीराम विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित करण्यात आली. या प्रदर्शनीचा समारोप गुरूवारी करण्यात आला. स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरित करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं. स. उपसभापती मनोज दुनेदार होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी पं. स. सभापती प्रभाकर तुलावी, शाळा समिती अध्यक्ष वामनराव फाये, माजी पं. स. सदस्य चांगदेव फाये, नगरसेवक नागेश्वर फाये, मुख्याध्यापक पी. डब्ल्यू. भरणे उपस्थित होते. प्रदर्शनात इयत्ता नववी ते बारावीच्या गटात प्रथम क्रमांक श्रीराम विद्यालयाची ऋतुजा अरूण कोडापे, द्वितीय क्रमांक विद्याभारती विद्यालयाचा पारिजातक बावनथडे, तृतीय क्रमांक रामगड आश्रमशाळेचा शेषराव गावडे, आदिवासी गटातून प्रथम क्रमांक श्रीराम महाविद्यालयाचा यश बारीकराव पंधरे याने पटकाविला. इयत्ता सहावीच्या आठवीच्या गटात प्रथम क्रमांक रोशनी धनराज दरवडे, द्वितीय लक्ष्मी राजकुमार नरोटे जि. प. शाळा दादापूर, तृतीय क्रमांक शिवाजी हायस्कूल कुरखेडाची तृप्ती यादव बाळबुद्धे, आदिवासी गटातून प्रथम क्रमांक नान्ही जि. प. शाळेचा प्रवीण संतोष सिंद्राम यांनी पटकाविला. शैक्षणिक साहित्य निर्मितीत हायस्कूल गटात देऊळगावचे दिलीप अहुजा, लोकसंख्या शिक्षण प्राथमिक गटात पी. डी. बोळणे, शैक्षणिक साहित्य प्राथमिक गटात नरहरी रामटेके यांनी अव्वल स्थान पटकाविले.कार्यक्रमाचे संचालन श्याम सोनुले, प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी शिवणकर तर आभार एस. पी. बांगरे यांनी मानले.