शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

जिल्हाभरात शाळा, महाविद्यालये बंद

By admin | Updated: October 7, 2016 01:29 IST

कायम विनाअनुदानित कृती समितीच्या वतीने औरंगाबाद येथे मंत्रीमंडळाच्या बैठकीवर मोर्चा नेण्यात आला होता.

शिक्षकांवरील लाठीमार प्रकरणाचा निषेध : कान्व्हेंट शाळांनाही सुटीगडचिरोली : कायम विनाअनुदानित कृती समितीच्या वतीने औरंगाबाद येथे मंत्रीमंडळाच्या बैठकीवर मोर्चा नेण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी शिक्षकांच्या मोर्चावर लाठीमार केला. या प्रकरणात ३०० शिक्षकांविरूध्द भादंविच्या ३०७ कलमान्वये (खुनाचा प्रयत्न) व दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ५९ शिक्षकांना अटक करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ गडचिरोली जिल्ह्यात गुरूवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदमध्ये शाळा, महाविद्यालय, इंग्रजी माध्यमांचे कॉन्व्हेंटही सहभागी झाले होते.गडचिरोली शहरात सकाळपाळीतील सर्व शाळांना सुटी देण्यात आली होती. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले. त्यानंतर विनाअनुदानित शाळा कृती समिती गडचिरोली जिल्हा व अन्य विविध शिक्षक संघटनांच्या वतीने या घटनेचा निषेध करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन देताना मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संजय नार्लावार, सचिव टी. के. बोरकर, संस्थाचालक संघ कार्याध्यक्ष अनिल पाटील म्हशाखेत्री, सचिव राजेंद्र लांजेकर, संस्थाचालक संघ कृती समितीचे अध्यक्ष डॉ. राजाभाऊ मुनघाटे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष दत्तात्रय खरवडे, कार्यवाह अजय लोंढे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अध्यक्ष विजय कोमेरवार, कार्यवाह रमेश बोरकर, डॉ. पंजाबराव देशमुख राज्य शिक्षक परिषदेचे विभागीय अध्यक्ष शेषराव येलेकर, सचिव कमलाकर, रडके, विज्युक्टाचे अध्यक्ष भाऊराव गोरे, सचिव धर्मेंद्र मुनघाटे, राज्य शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे अविनाश चडगुलवार, गडचिरोली जिल्हा शिक्षकेत्तर कर्मचारी संघाचे अध्यक्ष अशोक काचिनवार, सचिव संजय मल्लेलवार, शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष पंकज नरूले, सचिव विजय मेश्राम, विनाअनुदानित शाळा कृती समितीचे अध्यक्ष विलास बल्लमवार, उपाध्यक्ष सुनिल पोरेड्डीवार, प्राचार्य जी. एम. दिवटे, मामीडवार, विनाअनुदानित कृती समितीचे कोषाध्यक्ष शेखर उईके, प्राचार्य जयंत येलमुले, विमाशीचे माजी प्रांतीय कोषाध्यक्ष शेमदेव चाफले आदी उपस्थित होते. तसेच गुरूवारी अहेरी उपविभागातील विविध शाळाही या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. या शाळांनीही बंद पाळला. अहेरी शहरातील राजे धर्मराव शाळा, भगवंतराव हायस्कूल, कै.च.ल. मद्दीवार शाळा, रिपब्लिक शाळा, साईबाबा प्राथमिक शाळा, संत मानव दयाल शाळा, उपविभागातील सर्व अनुदानीत, विनाअनुदानीत शाळा बंद करण्यात आल्या. जय पेरसापेन माध्यमिक शाळा बुर्गी, संत मानवदयाल विद्यालय अहेरी, स्व.विमलताई ओल्लालवार विद्यालय बोरी, भगवंत हायस्कूल चेरपल्ली, रिपब्लिक इंग्लिश मिडियम स्कूल, भगवंतराव हायस्कूल पेरमिली, जय पेरसापेन विद्यालय कमलापूर, पुष्पप्रियादेवी विद्यालय जीमलगट्टा, पुष्पप्रियादेवी विद्यालय देवलमरी, राजीव गांधी हायस्कूल एटापल्ली, संत मानवदयाल विद्यालय रंगय्यापल्ली, भगवंतराव हायस्कूल आरडा आदी शाळा बंद होत्या. इतर भागातही या आंदोलनाला शाळा, महाविद्यालय संस्थाचालक, शिक्षक, विद्यार्थी, प्राध्यापक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. (जिल्हा प्रतिनिधी)