शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पटसंख्या टिकविण्यासाठी शाळांची दमछाक

By admin | Updated: August 10, 2014 23:01 IST

पटपडताळणीचे भूत शिक्षकांच्या मानगुटीवर अजून उतरलेले नसतांनाच नवीन संच मान्यतेच्या निकषांची दहशत शिक्षण क्षेत्राला हादरून टाकणारी ठरली आहे. मोठ्या प्रमाणावर इंग्रजी माध्यमांच्या

मालेवाडा : पटपडताळणीचे भूत शिक्षकांच्या मानगुटीवर अजून उतरलेले नसतांनाच नवीन संच मान्यतेच्या निकषांची दहशत शिक्षण क्षेत्राला हादरून टाकणारी ठरली आहे. मोठ्या प्रमाणावर इंग्रजी माध्यमांच्या शाळेकडे विद्यार्थी आकर्षित झाल्याने अनुदानित शाळांमधील पटसंख्या टिकविणे अशक्य होऊन बसले आहे. नवीन संच मान्यतेमुळे अनेक कर्मचारी, अतिरिक्त ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नवीन संच मान्यतेच्या नियमानूसार २०० विद्यार्थ्यांच्यावर १ परिचर, ५०० च्यावर १ लिपिक, प्रयोगशाळा परिचराचे १ पद ठरविण्यात आले आहे. १ ते ५ पर्यंत ३० विद्यार्थी, १ वर्ग १ शिक्षक, ६ ते ८ मध्ये ३५ विद्यार्थी १ वर्ग १ शिक्षक, ९ व १० मध्ये नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागास १५, आदिवासी उपयोजनेतील भागास २०, शहरी भागासाठी २५ एवढी विद्यार्थी संख्या निर्धारित करण्यात आली आहे. मात्र खेडोपाडी आता इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू झाल्या आहेत. त्यास जोडीस- जोड कायम विना अनुदानित शाळांचीही संख्या वाढत चालली आहे. जवळपास प्रत्येक गावामध्ये किंवा एक गाव आड दहावीपर्यंत शिक्षण देणाऱ्या शाळा असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पटसंख्या टिकविण्यासाठी अनुदानित शाळांची चांगलीच दमछाक होत आहे. नियमापेक्षा कमी विद्यार्थी राहत असल्याने संच मान्यता घेतेवेळी शाळांची दमछाम उडत चालली आहे. शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा मंत्रालयाचा वार्षिक अंदाज पत्रकीय खर्च ३३ हजार ३०० कोटी रूपये आहे. यापैकी ३० हजार कोटी रूपये केवळ कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च होतात. एकीकडे शासन शाळांना किमान विद्यार्थी संख्या निश्चित करून देत आहे तर दुसरीकडे मागेल त्याला शाळा देणे हे धोरण अवलंबिले आहे. यामुळे शिक्षक परिचर, लिपिक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अतिरिक्त ठरत आहेत. (वार्ताहर)