शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

राममोहनपूरची शाळा अद्यापही कुलूपबंदच

By admin | Updated: December 27, 2014 22:50 IST

अनेकदा जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी करूनही राममोहनपूर जि. प. शाळेला शिक्षक देण्यात आले नाही. परीक्षेचा कालावधी येताच संतप्त पालकांनी शाळा

गुंडापल्ली : अनेकदा जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी करूनही राममोहनपूर जि. प. शाळेला शिक्षक देण्यात आले नाही. परीक्षेचा कालावधी येताच संतप्त पालकांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने १७ डिसेंबरला शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांना बाहेर काढून शाळेला कुलूप ठोकले होते. मात्र पालकांची मागणी पूर्ण न झाल्याने राममोहनपूर शाळा अद्यापही कुलूपबंदच असल्याची माहिती आहे. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. चामोर्शी पंचायत समितीअंतर्गत राममोहनपूर या गावात जिल्हा परिषदेची १ ते ८ वर्गापर्यंतची उच्च प्राथमिक शाळा आहे. या शाळेत एकूण १०६ विद्यार्थी आठही वर्गात शिक्षण घेत आहेत. मात्र अर्धेअधिक सत्र संपूनही राममोहनपूर शाळेला नवे शिक्षक देण्यात आले नाही. यासंदर्भात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज मुरारी सरकार व अन्य पदाधिकाऱ्यांनी अनेकदा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे राममोहनपूर शाळेत तत्काळ नव्या शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे केली. याशिवाय पालकांनीही अधिकाऱ्यांकडे शिक्षक नियुक्त करण्याची मागणी लावून धरली होती. मात्र एकाही अधिकाऱ्यांनी दखल घेऊन राममोहनपूर शाळेत नव्या शिक्षकाची नियुक्ती केली नाही. राममोहनपूर शाळेत वर्षभरापासून दोनच शिक्षक कार्यरत असून त्यांना १ ते ८ वर्ग सांभाळण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. नक्षलग्रस्त, दुर्गम भागातील राममोहनपूर शाळेकडे अधिकारी व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. (वार्ताहर)