शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
Sachin Tendulkar, IND vs ENG: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
4
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
5
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
6
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
7
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
8
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
9
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
10
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
11
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
12
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
13
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
14
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
15
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
16
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
17
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
18
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
19
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
20
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...

नगर परिषदेच्या शाळा टाकणार कात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:47 IST

शहरातील नगर परिषदेच्या १० प्राथमिक शाळांचा दर्जा आणखी वाढविण्यासाठी काही भौतिक सुविधांसह विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यासाठी नगर परिषदेच्या फंडातून तरतूद केली जाणार आहे.

ठळक मुद्देभौतिक सुविधा : विद्यार्थ्यांसाठी डेस्क-बेंच, बूट-सॉक्स व बॅगही देणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शहरातील नगर परिषदेच्या १० प्राथमिक शाळांचा दर्जा आणखी वाढविण्यासाठी काही भौतिक सुविधांसह विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यासाठी नगर परिषदेच्या फंडातून तरतूद केली जाणार आहे.सध्या न.प.च्या १० शाळांमधून १४६३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गेल्या तीन वर्षाच्या तुलनेत यावर्षी विद्यार्थी संख्या जास्त असली तरी एका वर्गात सरासरी २८ विद्यार्थी असे प्रमाण सध्या आहे. वर्गखोल्या आणि उपलब्ध जागा पाहता नगर परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थीसंख्या आणखी वाढण्यासाठी वाव आहे.पहिली ते आठवडीपर्यंतच्या न.प.कडे केवळ तीन शाळा आहेत. त्यात रामनगरातील जवाहर नेहरू विद्यालयाने विविध सुविधा आणि दर्जाच्या बाबतीत आयएसओ मानांकन पटकावले आहे. त्याच धर्तीवर इतर शाळांचा दर्जा सुधाण्यासाठी शाळांना एलईडी लाईट, पंखे, काही शाळांना नवीन डेस्क बेंच, विद्यार्थ्यांना बूट व सॉक्स तसेच स्कूल बॅगही दिल्या जाणार आहेत. त्यासाठी सध्या ७ ते ८ लाख रुपयांची तरतूद नगर परिषदेच्या फंडातून करण्यात आली आहे.विशेष म्हणजे सर्व १० शाळा डिजीटल आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षण मिळत आहे. शासनाकडून विद्यार्थ्यांना गणवेश, शिक्षण शुल्क आणि खेळाचे साहित्य आदी पुरविले जाते. मात्र नगर परिषदेच्या मर्यादित निधीमुळे अनेक कल्पना प्रत्यक्षात साकारणे शक्य होत नाहीत अशी खंत काही मुख्याध्यापकांनी व्यक्त केली. तरीही शैक्षणिक दर्जा राखण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे.या शाळांवर ५५ शिक्षकांचे पदे मंजूर असली तरी ४९ पदेच भरलेली आहेत. रिक्त असलेल्या ६ जागा भरण्यासाठी नागपूर विभागाच्या शिक्षण उपसंचालकांकडे पाठपुरावा सुरू आहे.