शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

शाळा साहित्याचे कंत्राट नियमबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 22:56 IST

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी सिरोंचा येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाला शनिवारी आकस्मिक भेट दिली असता, या भेटीत सदर शाळेच्या गृहपाल गैरहजर आढळून आल्या.

ठळक मुद्देगृहपाल गैरहजर : जि.प. उपाध्यक्षांच्या भेटीदरम्यान आढळली अनियमितता

आॅनलाईन लोकमतसिरोंचा : जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी सिरोंचा येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाला शनिवारी आकस्मिक भेट दिली असता, या भेटीत सदर शाळेच्या गृहपाल गैरहजर आढळून आल्या. तसेच गणवेश, भाजीपाला व पाठ्यपुस्तक वाटपाचे कंत्राट नियमबाह्य असल्याचे तपासणीदरम्यान आढळून आले.याप्रसंगी आविसंचे पदाधिकारी आकुला मल्लीकार्जुनराव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सतीश गंजीवार, आविसंचे तालुकाध्यक्ष बानय्या जनगाम, सिरोंचाचे माजी उपसरपंच रमेश सल्लम, प्रसाद मद्दीवार, पेंटिपाकाचे उपसरपंच कुमरी सडवली, रवी बोंगोनी, जाफ्राबाद ग्रामपंचायतीचे उपसरपंच दुर्गम तिरूपती आदी उपस्थित होते.गणवेश, भाजीपाला व पाठ्यपुस्तक आदी वाटपाचे कंत्राट हे एकदाच निविदा मागवून संबंधितांना कंत्राट दिल्याचे जि.प. उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या निदर्शनास आले. कमी दराने पुरवठा करणाºया कंत्राटदारांना कंत्राट न देता जादा दराने या साहित्याचा पुरवठा करणाºया कंत्राटदाराला नियमबाह्यरित्या कंत्राट दिल्याचे यावेळी दिसून आले. सदर शाळेच्या गृहपालांनी तीन दिवसांच्या रजेचा अर्ज दिला. मात्र सहा दिवसांपासून त्या शाळेत गैरहजर असल्याचे हजेरी रजिस्टरवरून दिसून आले. या दोन्ही प्रकाराबाबत उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गणवेश, भाजीपाला, पाठ्यपुस्तकाच्या नियमबाह्य कंत्राटाबाबत संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी, असा शेरा उपाध्यक्ष कंकडालवार यांनी भेटीच्या रजिस्टरमध्ये नमूद केला. याप्रसंगी कंकडालवार यांनी विद्यार्थिनींशी तसेच तेथील शिक्षकांशी चर्चा करून शाळेच्या समस्या जाणून घेतल्या. याबाबत कारवाई होणार काय, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.