शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

कोरची तालुक्यात शाळाबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 00:13 IST

अघोषित, अंशत: अनुदानित शाळांना १०० टक्के अनुदान द्यावे, या मागणीसाठी महाराष्टÑ राज्य कायम विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने राज्यभर आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात कोरची तालुक्यातील अघोषित, अंशत: अनुदानित शाळा सहभागी झाल्या आहेत.

ठळक मुद्देअनेक शाळा सहभागी : १०० टक्के अनुदान देण्याची कृती समितीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : अघोषित, अंशत: अनुदानित शाळांना १०० टक्के अनुदान द्यावे, या मागणीसाठी महाराष्टÑ राज्य कायम विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने राज्यभर आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात कोरची तालुक्यातील अघोषित, अंशत: अनुदानित शाळा सहभागी झाल्या आहेत. १६ आॅगस्टपासून आंदोलन सुरू करण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने ५ आॅगस्टपासून राज्यात आंदोलन सुरू करण्यात आले होते. परंतु शासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. त्यामुळे १६ आॅगस्टपासून राज्यभरातील अंशत: अनुदानित, अघोषित शाळा बंद ठेवण्याचे कृती समितीने ठरविले. त्यानुसार कोरची तालुक्यातील सर्व अघोषित, अंशत: अनुदानित शाळा शाळाबंद आंदोलनात सहभागी झाल्या. यामध्ये राष्ट्रीय विद्यालय बिहीटेकला, अरूणा विद्यालय कोटरा, शहीद बिरसा मुंडा हायस्कूल बोरी, टिपागड विद्यालय कोटगूल, धनंजय स्मृती विद्यालय देऊळभट्टी, महात्मा जोतिबा विद्यालय बेलगाव घाट आदी शाळांचा समावेश आहे.शासनाकडे वेळोवेळी अनुदानाची मागणी करूनही दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे या शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे १०० टक्के अनुदान द्यावे, अशी मागणी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे करण्यात आली.वेतनवाढ प्रक्रिया ठप्प२० टक्के अनुदान लागू केलेल्या शाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी वेतनात वाढ होईल, या आशेने कर्ज घेऊन रक्कम गुंतवली. मात्र २० टक्याच्या पलिकडचा टप्पा वेतनाने गाठला नाही. दरवर्षी २० टक्यानुसार पगार वाढत नसल्याने शिक्षक अडचणीत सापडले आहेत. विना अनुदानित शाळांचे कर्मचारी आर्थिक प्रश्नाने चिंताग्रस्त झाल्याचे दिसून येत आहेत.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र