शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बचत गटांनी केली सूर्यफुलाची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 01:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सिंचनाच्या मर्यादित सुविधा, त्यात पारंपरिक धानपिकाशिवाय दुसरे पीक घेण्याची हिंमत आणि मार्गदर्शन नसल्यामुळे जिल्ह्यातील सामान्य शेतकरी शेतीतील वेगळ्या प्रयोगाकडे कधी वळलेच नाही. पण अलिकडे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन विभागाच्या (आत्मा) मार्गदर्शनातून बचत गटासोबत जोडलेल्या काही शेतकऱ्यांना हिंमत मिळाली आणि त्यांच्या शेतात आता सुर्यफुलाचे पीक डोलू लागले आहे.कुरखेडा ...

ठळक मुद्देनवरगावच्या शेतकऱ्यांचा प्रयोग : ‘आत्मा’च्या प्रशिक्षणातून नगदी पिकांकडे वळताहेत शेतकरी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सिंचनाच्या मर्यादित सुविधा, त्यात पारंपरिक धानपिकाशिवाय दुसरे पीक घेण्याची हिंमत आणि मार्गदर्शन नसल्यामुळे जिल्ह्यातील सामान्य शेतकरी शेतीतील वेगळ्या प्रयोगाकडे कधी वळलेच नाही. पण अलिकडे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन विभागाच्या (आत्मा) मार्गदर्शनातून बचत गटासोबत जोडलेल्या काही शेतकऱ्यांना हिंमत मिळाली आणि त्यांच्या शेतात आता सुर्यफुलाचे पीक डोलू लागले आहे.कुरखेडा तालुक्यातील नवरगाव येथील ११ शेतकºयांनी शेतकरी पुरूष बचत गटाची स्थापना करून ११ एकरात सुर्यफुलाची लागवड केली. ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक डॉ.प्रकाश पवार यांनी त्या शेतकऱ्यांना नगदी पिकांकडे वळण्याचा सल्ला देत कोणकोणती पिके ते घेऊ शकतात यासंदर्भात मार्गदर्शन केले. नगदी पिकांमुळे कमी-जास्त पाऊस किंवा कीडीच्या प्रादुर्भावामुळे घटणारे पिकांचे उत्पादन, महागडे बियाणे, कीटकनाशकासाठीवारंवार करावा लागणारा खर्च हे काही प्रमाणात नियंत्रणात येईल, ही बाब शेतकऱ्यांच्या गळी उतरविली. त्यामुळे शेतकरीही वेगळा प्रयोग करण्यासाठी तयार झाले. यातून जानेवारी २०१८ मध्ये सुर्यफुलाची लागवड केली आणि आता हे पीक चांगलेच बहरले आहे.शेतकरी बचत गटाचे अध्यक्ष उदाराम कवाडकर यांनी सांगितले की, सुर्यफुलाच्या लागवडीसाठी एकरी ७ हजार रुपयांचा खर्च आला. एकूण जवळपास ८० हजारांचा खर्च आला. त्यातून १०० क्विंटल सूर्यफुलाचे उत्पादन होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.मधमाशी पालनही सोबतच सुरूसूर्यफुलाच्या शेतीसोबतच मधमाशी पालनाचे तंत्रही शेतकऱ्यांना दिले आहे. या शेतकºयांच्या उत्पादनात भर पडणार आहे. कमी खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या या पिकातून इतर शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास आत्माचे संचालक डॉ.प्रकाश पवार यांनी व्यक्त केला.