शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

अहेरीत गरजू महिलांना साडी वाटप

By admin | Updated: September 26, 2015 01:17 IST

धर्मराव शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्ष तथा गडचिरोली जिल्हा परिषदेच्या सदस्य राजमाता राणी रूक्मिणीदेवी ....

१० जणांचे रक्तदान : विमा योजनेसाठी पाच हजार अर्ज स्वीकारलेअहेरी : धर्मराव शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्ष तथा गडचिरोली जिल्हा परिषदेच्या सदस्य राजमाता राणी रूक्मिणीदेवी यांच्या उपस्थितीत राजमहालाच्या विस्तीर्ण पटांगणावर शुक्रवारी अहेरी येथे विविध कार्यक्रम घेण्यात आले. याप्रसंगी गरजू गरीब महिलांना साडी वाटप राणी रूक्मिणीदेवी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, नाविसचे युवानेते कुमार अवधेशरावबाबा, प्रविणरावबाबा आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात राजमाता रूक्मिणीदेवी यांच्या हस्ते पंतप्रधान सुरक्षा बंधन विमा योजनेचे उद्घाटन करून करण्यात आली. यावेळी मोटार सायकल परवाना, लाभार्थ्यांना शिधापत्रिकेचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आयोजित रक्तदान शिबिरात १० रक्तदात्यांनी रक्तदान केले. विमा सुरक्षा योजनेंतर्गत पाच हजार नागरिकांचे अर्ज स्वीकृत करण्यात आले. या कार्यक्रमाला अहेरी उपविभागातील पाच तालुक्यातील शेकडो नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी राणी रूक्मिणीदेवी यांनी आपले दोन्ही सुपूत्र जनसेवेसाठी आपण अर्पण केले आहे व आपल्या प्रत्येकाचे दु:ख दूर करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असे प्रतिपादन केले. राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी आपल्या आईने आपल्याला सत्य व जनसेवेचा मार्ग दाखविला. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण सदैव तत्परतेने काम करू, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे संचालन कृष्णा मंचार्लावार तर आभार प्रकाश गुडेल्लीवार यांनी मानले. (प्रतिनिधी)