शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

१४ ग्रामसभेची तेंदू संकलनात सरशी

By admin | Updated: June 8, 2014 23:52 IST

सन १९९६ चा पेसा कायदा व २00६ चा सामुहिक वनहक्क अधिनियमानुसार ग्रामसभेला त्यांच्या परिसरात येणार्‍या नैसर्गिक साधनसंपत्तीचा हक्क प्रदान करण्यात आला. या दोन्ही कायद्याची अंमलबजावणी

गडचिरोली : सन १९९६ चा पेसा कायदा व २00६ चा सामुहिक वनहक्क अधिनियमानुसार ग्रामसभेला त्यांच्या परिसरात येणार्‍या नैसर्गिक साधनसंपत्तीचा हक्क प्रदान करण्यात आला. या दोन्ही कायद्याची अंमलबजावणी करणारा गडचिरोली जिल्हा प्रथम ठरला. याच कायद्याअन्वये जिल्ह्यातील १४ ग्रामसभेने पुढाकार घेऊन यंदाच्या तेंदू हंगामात एकूण ९८.५५ टक्के तेंदू संकलन केले आहे. जिल्ह्यातील पाच वनविभागांतर्गत १६0 तेंदू युनिट आहेत. यापैकी यंदा ११0 तेूंद युनिटमध्ये तेंदू संकलनाचे काम झाले. १४ तेंदू युनिट ग्रामसभेला देण्यात आले. यात गडचिरोली वनविभागातील महावाडा, सावरगाव, वडसा वनविभागातील वैरागड ग्रामसभेचा समावेश आहे. आलापल्ली वनविभागात वेगनूर-गरंजे, रेगडी, बोलेपल्ली, पोटेपल्ली-मक्केपल्ली, मत्तेगुडा, वेडमपल्ली आदी सहा ग्रामसभेला तेंदू संकलनाचे कंत्राट देण्यात आले. भामरागड वनविभागातील एटापल्ली व गेदा या दोन ग्रामसभांना तेंदू संकलनाचे काम देण्यात आले. सिरोंचा वनविभागात ३ तेंदू युनिट ग्रामसभांना देण्यात आले. यात छल्लेवाडा-कोरेपल्ली, रेगुलवाही-तिमरन-करंचा आणि असरअल्ली-अंकिसा आदी ग्रामसभांना समावेश आहे.गडचिरोली वनविभागातील दोन ग्रामसभांनी यंदा ३४८४.५६५ इतके प्रमाणित गोणी तेंदू संकलन केले असून याची टक्केवारी ९९.५६ आहे. वडसा वनविभागातील एका ग्रामसभेने १५९९.७७५ प्रमाणित गोणी संकलन केले असून याची टक्केवारी ९८.७५ आहे. आलापल्ली वनविभागातील सहा ग्रामसभांनी एकूण १0८६१.७४५ इतके प्रमाणित गोणी तेंदू संकलन केले असून याची टक्केवारी १0२.९५ आहे. भामरागड वनविभागातील दोन ग्रामसभांनी यंदा एकूण २९९0.२९0 इतके प्रमाणित गोणी तेंदू संकलन केले असून याची टक्केवारी ६८ आहे. सिरोंचा वनविभागातील ३ ग्रामसभांची यंदाच्या तेंदू संकलनाची टक्केवारी ९२.७३ आहे. या ग्रामसभांनी एकूण ८५३0.७0५ इतके प्रमाणित गोणी तेंदू संकलन केले आहे. १४ ग्रामसभांनी मिळून यंदा एकूण २७४६७.८0 प्रमाणित गोणी तेंदू संकलन केले असून याची टक्केवारी ९८.५५ आहे. ग्रामसभांमार्फत यंदा २६ मे ते १ जून २0१४ या कालावधीत तेंदू संकलनाचे काम करण्यात आले. कंत्राटदारांनी न खरेदी केलेल्या तेंदू युनिटच्या हद्दीत ग्रामसभेच्या पुढाकारामुळे मजूरांना रोजगार मिळाला.