शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

रात्रीच्या अंधारात चालते रेतीची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 05:00 IST

देसाईगंज तालुक्यातील नदी घाटांचा लिलाव होऊन काेट्यवधी रुपयांचा महसूल शासनाला एकट्या तालुक्यातून दरवर्षी मिळताे. सद्य:स्थितीत नदी घाटांचे लिलाव झाले नसल्याने रेती चोरीचे प्रमाण वाढून ट्रॅक्टर व इतर साधनांचा वापर करून रेती चोर मालामाल होत आहेत. कोंढाळा येथे वाहतुकीची साधने भरपूर प्रमाणत आहेत. गावापासून काही अंतरावरच वैनगंगा नदी आहे. गावानजीक वैनगंगा नदीपात्र असल्याने नेमका याच संधीचा फायदा काही ट्रॅक्टरधारक व इतर अवैध व्यावसायिक घेत आहेत.

ठळक मुद्देमहसूल विभाग गाढ झाेपेत : कोंढाळा वैनगंगा नदीतील रेती तस्करी थांबेना

लाेकमत न्यूज नेटवर्ककुरूड : देसाईगंज तालुक्यातील कोंढाळालगतच्या वैनगंगा नदीपात्रातून रात्री अवैधरीत्या रेतीचा उपसा करून १० ते १५ ट्रॅक्टर व अन्य साधनांद्वारे वाहतूक केली  जात आहे; परंतु या प्रकाराकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष हाेत आहे. त्यामुळे शासनाचा काेट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. महसूल विभागाकडून काेणत्याही प्रकारची कारवाई हाेत नसल्याने रेतीतस्करीमुळे अवैध व्यावसायिकांचे फावले आहे.देसाईगंज तालुक्यातील नदी घाटांचा लिलाव होऊन काेट्यवधी रुपयांचा महसूल शासनाला एकट्या तालुक्यातून दरवर्षी मिळताे. सद्य:स्थितीत नदी घाटांचे लिलाव झाले नसल्याने रेती चोरीचे प्रमाण वाढून ट्रॅक्टर व इतर साधनांचा वापर करून रेती चोर मालामाल होत आहेत. कोंढाळा येथे वाहतुकीची साधने भरपूर प्रमाणत आहेत. गावापासून काही अंतरावरच वैनगंगा नदी आहे. गावानजीक वैनगंगा नदीपात्र असल्याने नेमका याच संधीचा फायदा काही ट्रॅक्टरधारक व इतर अवैध व्यावसायिक घेत आहेत. नदीपात्रातून अवैध रेतीचा उपसा करून रेती विक्री करीत असल्याचे आढळून येत आहेत. रेतीच्या अवैध उपशामुळे नदीपात्र खोलगट झाले आहे. अंदाजे  हजारो ब्रास रेतीचा उपसा यापूर्वी झाला आहे. लाखाे ब्रासपर्यंत रेतीचा उपसा हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.वैनगंगा नदीच्या रेती घाटाच्या लिलावावर पर्यावरण विभागाने बंदी घातली आहे. त्यामुळे वैनगंगा नदीचा एकही रेती घाट लिलावात काढला नाही. शिवाय तालुक्यातील अन्य रेती घाटांचे लिलाव झाले नाही. याचाच फायदा घेत वैनगंगा नदी घाटातून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा राजरोसपणे सुरू आहे. त्यासाठी कधी छुपे पाठबळ तर कधी महसूल यंत्रणेला हुलकावणी देऊन आपले अवैध काम व्यवस्थित पार पाडले जात आहे. महसूल प्रशासन  आहे तरी कुठे, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. तर अवैध रेती तस्कर अधिकाधिक आर्थिक नफा कमवत आहेत. 

ट्रॅक्टरधारकांचे ऑनलाईन धागेदाेरेकाेंढाळा वैनगंगा नदी घाटावरून रात्री अवैध रेती तस्करी हाेत असताना महसूल विभागाचे अधिकारी गाढ झाेपेत असतात. विशेष म्हणजे, अधिकाऱ्यांच्या घरापासून पाळत ठेवण्यासाठी रेतीतस्कर माणसे पाेसतात. अधिकारी जागे हाेऊन कारवाई करण्यासाठी बाहेर पडल्यास त्याची माहिती रेतीतस्करांना दिली जाते. वैनगंगा नदीकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असतानाही या खड्ड्यांमध्ये रेती भरून रस्ता सुयाेग्य करण्यात आला आहे. ट्रॅक्टरधारकांचे सर्वत्र धागेदोरे व संपर्कासाठी जाळे पसरले आहे. सर्वत्र लक्ष ठेवून रेतीची तस्करी केली जाते.

 

टॅग्स :sandवाळूSmugglingतस्करी