शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

चामोर्शी तालुक्यात रेती तस्करी जाेरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 05:00 IST

तालुक्यातीलच नव्हेतर जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील अनेक रेती तस्कर झटपट श्रीमंत होण्याच्या नादात चामोर्शीला पायधूळ झाडतात. जिल्ह्याबाहेरील रेती तस्कर, चामोर्शी तालुक्यातील रेती ठेकेदार व महसूल विभागातील कर्मचारी यांची साटेलोटे निर्माण होऊन बहुमोल रेतीचे अवैध उत्खनन करण्याचा सपाटा नियमित सुरू आहे.  रेती तस्करीची तक्रार हाेतातच एखाद्यावेळी तस्कराचा ट्रॅक्टर पकडून अवैध रेती उत्खननावर निर्बंध असल्याचे दर्शविले जाते.

ठळक मुद्देगावागावातील रेती घाटांवरून चाेरी; महसूल यंत्रणेचे दुर्लक्ष

लाेकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : तालुक्यातील विविध घाटांवरून रेती तस्करी जाेरात सुरू आहे. मात्र याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष हाेत असल्याने रेती तस्करांचे फावत चालले आहे. चामोर्शी तालुक्याचे क्षेत्रफळ मोठे असून, बाजूलाच वैनगंगा नदी आहे. नदीकाठच्या गावागावात घाट निर्माण झाले आहेत. सर्व घाटांवर उच्च प्रतीची रेती आहे. तालुक्यातीलच नव्हेतर जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील अनेक रेती तस्कर झटपट श्रीमंत होण्याच्या नादात चामोर्शीला पायधूळ झाडतात. जिल्ह्याबाहेरील रेती तस्कर, चामोर्शी तालुक्यातील रेती ठेकेदार व महसूल विभागातील कर्मचारी यांची साटेलोटे निर्माण होऊन बहुमोल रेतीचे अवैध उत्खनन करण्याचा सपाटा नियमित सुरू आहे.  रेती तस्करीची तक्रार हाेतातच एखाद्यावेळी तस्कराचा ट्रॅक्टर पकडून अवैध रेती उत्खननावर निर्बंध असल्याचे दर्शविले जाते. काही दिवसातच रेतीतस्कर  वेगवेगळे फंडे वापरून अवैध रेती उत्खनन सुरूच ठेवतात. अवैध उत्खननातील रेतीसाठ्याची नियमानुसार लिलाव प्रक्रिया पार पाडली जाते. ज्याने अवैध उत्खनन केले त्याच व्यक्तीला लिलाव कसा मिळेल याचे आधीच प्रयोजन केले जाते. लिलाव झाल्यावर त्याच ढिगावर परत नदीतील चाेरीची रेती टाकून ढिगावरून रेतीची चाेरी केली जाते. मोहोर्ली, दोटकुली, गणपूर, आमगाव महाल, वेलतूर तुकूम अशा दुर्गम गावाच्या नदीकाठावर अवैध रेती उत्खनन करण्याचा गोरखधंदा अनेक दिवसांपासून सुरू आहे. 

महसूल विभाग म्हणते रेती तस्करी हाेतच नाहीमहसूल विभाग सांगतो की, अवैध रेती चाेरीवर निर्बंध घातले आहे तसेच अवैध उत्खननाचा नियमानुसार लिलाव करण्यात येतो. म्हणजे खरे काय? अवैध रेती उत्खननावर निर्बंध आहेत तर लिलाव कशाचा केला जातो. निर्बंध असणे वा अवैध उत्खनन होणे एकाचवेळी दोन बाबी कशा होतात, असा संभ्रम सर्वसामान्यांना पडला आहे.

 

टॅग्स :sandवाळू