शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रात्री १० ते १५ ट्रॅक्टरद्वारे हाेताे रेतीचा उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:25 IST

‌देसाईगंज तालुक्यातील नदी घाटांचा लिलाव होऊन काेट्यवधी रुपयांचा महसूल शासनाला एकट्या तालुक्यातून दरवर्षी मिळताे. सद्य:स्थितीत नदी घाटांचे लिलाव झाले ...

‌देसाईगंज तालुक्यातील नदी घाटांचा लिलाव होऊन काेट्यवधी रुपयांचा महसूल शासनाला एकट्या तालुक्यातून दरवर्षी मिळताे. सद्य:स्थितीत नदी घाटांचे लिलाव झाले नसल्याने रेती चोरीचे प्रमाण वाढून ट्रॅक्टर व इतर साधनांचा वापर करून रेती चोर मालामाल होत आहेत. कोंढाळा येथे वाहतुकीची साधने भरपूर प्रमाणत आहेत. गावापासून काही अंतरावरच वैनगंगा नदी आहे. गावानजीक वैनगंगा नदीपात्र असल्याने नेमका याच संधीचा फायदा काही ट्रॅक्टरधारक व इतर अवैध व्यावसायिक घेत आहेत. नदीपात्रातून अवैध रेतीचा उपसा करून रेती विक्री करीत असल्याचे आढळून येत आहेत. रेतीच्या अवैध उपशामुळे नदीपात्र खोलगट झाले आहे. अंदाजे हजारो ब्रास रेतीचा उपसा यापूर्वी झाला आहे. लाखाे ब्रासपर्यंत रेतीचा उपसा हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वैनगंगा नदीच्या रेती घाटाच्या लिलावावर पर्यावरण विभागाने बंदी घातली आहे. त्यामुळे वैनगंगा नदीचा एकही रेती घाट लिलावात काढला नाही. शिवाय तालुक्यातील अन्य रेती घाटांचे लिलाव झाले नाही. याचाच फायदा घेत वैनगंगा नदी घाटातून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा राजरोसपणे सुरू आहे. त्यासाठी कधी छुपे पाठबळ तर कधी महसूल यंत्रणेला हुलकावणी देऊन आपले अवैध काम व्यवस्थित पार पाडले जात आहे. महसूल प्रशासन आहे तरी कुठे, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे.

बाॅक्स

ट्रॅक्टरधारकांचे ऑनलाइन धागेदाेरे

काेंढाळा वैनगंगा नदी घाटावरून रात्री अवैध रेती तस्करी हाेत असताना महसूल विभागाचे अधिकारी गाढ झाेपेत असतात. विशेष म्हणजे, अधिकाऱ्यांच्या घरापासून पाळत ठेवण्यासाठी रेतीतस्कर माणसे पाेसतात. अधिकारी जागे हाेऊन कारवाई करण्यासाठी बाहेर पडल्यास त्याची माहिती रेतीतस्करांना दिली जाते. वैनगंगा नदीकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असतानाही या खड्ड्यांमध्ये रेती भरून रस्ता सुयाेग्य करण्यात आला आहे. ट्रॅक्टरधारकांचे सर्वत्र धागेदोरे व संपर्कासाठी जाळे पसरले आहे. सर्वत्र लक्ष ठेवून रेतीची तस्करी केली जाते.