शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

लिलाव झाला नसतानाही देसाईगंजात रेती डम्पिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 05:00 IST

देसाईगंज शहराच्या जवळपास सर्वच वाॅर्डांत मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचा साठा करून ठेवला आहे. शहरात मोठ्या प्रमाणात रेतीसाठा उपलब्ध असताना तालुक्यातील गाढवी व वैनगंगा नदीघाटातून मोठ्या प्रमाणात अवैध खनन करून सहा ते सात हजार रुपये प्रतिब्रास दराने शासकीय, निमशासकीय बांधकामाकरिता पुरवठा करण्यात येत आहे. देसाईगंज शहरासह तालुक्यात पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकुल आवास योजना, शबरी घरकुल योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात घरकुलांचे बांधकाम सुरू आहे.

ठळक मुद्देसाठेबाजी जाेमात : चाैकशी करण्याची नागरिकांची मागणी

लाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : तालुक्यातील एकाही नदीघाटाचा लिलाव यावर्षी झाला नाही. तरीसुद्धा शहरासह तालुक्यात सुरू असलेल्या शासकीय, निमशासकीय बांधकामाकरिता मोठ्या प्रमाणात रेतीचा पुरवठा करण्यात येत आहे. एवढेच नव्हे तर शहराच्या अनेक वाॅर्डांत मोठ्या प्रमाणात अवैध डम्पिंग करून ठेवण्यात आले आहे. अवैधरीत्या साठा करून ठेवलेल्या रेतीची चाैकशी करून कारवाई करावी, अशी मागणी देसाईगंज येथील सुजाण नागरिकांनी केली आहे.  देसाईगंज शहराच्या जवळपास सर्वच वाॅर्डांत मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचा साठा करून ठेवला आहे. शहरात मोठ्या प्रमाणात रेतीसाठा उपलब्ध असताना तालुक्यातील गाढवी व वैनगंगा नदीघाटातून मोठ्या प्रमाणात अवैध खनन करून सहा ते सात हजार रुपये प्रतिब्रास दराने शासकीय, निमशासकीय बांधकामाकरिता पुरवठा करण्यात येत आहे. देसाईगंज शहरासह तालुक्यात पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकुल आवास योजना, शबरी घरकुल योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात घरकुलांचे बांधकाम सुरू आहे. नगर परिषदेसह ग्रामपंचायतअंतर्गत सिमेंट-काॅंंक्रीटची मोठ्या प्रमाणात बांधकामे करण्यात येत आहेत. देसाईगंज तालुक्यातील नदीघाटांचे लिलाव अद्यापही झाले नसताना सदर बांधकामासाठी तस्करीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रेतीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र डम्पिंग करून ठेवलेल्या रेती साठ्याकडे महसूल विभाग दुर्लक्ष करीत आहे. बांधकाम करणाऱ्यांना कमी दरात रेतीपुरवठा होणे शक्य असताना बांधकामे वेळेत पूर्ण करण्याच्या नादात चोरीची रेती खरेदी करून बांधकाम करणाऱ्यांना अधिकचा भुर्दंड पडत आहे. शहराच्या विविध वाॅर्डांत साठा करून ठेवलेल्या रेतीची चाैकशी करून कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

साठवणूक करण्यासाठी मंजुरी घेतलीच नाहीअधिकृत  रेती पुरवठा करणाऱ्या व्यावसायिकांनी डम्पिंग करून ठेवलेल्या रेतीसाठ्याची जिल्हा खनिकर्म कार्यालयाकडे आवश्यक रक्कम जमा करून रेती विक्री करण्याची मंजुरी देण्याची मागणीदेखील केली असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र याबाबत अद्यापही निर्णय घेऊन रेती पुरवठ्याची परवानगी देण्यात आली नाही. शहरासह तालुक्यात चोरट्या मार्गाने रेतीची तस्करी करून डम्पिंग करून ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. महसूल विभागाने याबाबत चाैकशी करून कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

 

टॅग्स :sandवाळू