शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नगर परिषदा व नगर पंचायतींच्या इमारतींसाठी 25 काेटी रुपये मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 05:00 IST

या वर्षी सन २०२१-२२ करिता मंजूर नियतव्यय ४५४ कोटी बाबतही सदस्यांनी संबंधित विभागाकडून माहिती जाणून घेतली. काेराेनाच्या संकटामुळे राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्याच्या विकास निधीत कपात केली आहे. मात्र गडचिराेली जिल्ह्याला विशेष बाब म्हणून निधी कपात करू दिला नाही. गडचिराेली जिल्ह्याला पूर्ण ४५४ काेटी रुपये मंजूर झाले आहेत, अशी माहिती पालकमंत्र्यांनी सभेत दिली.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : गडचिराेली व देसाईगंज नगर परिषदांच्या प्रशासकीय इमारतींसाठी प्रत्येकी २.५ काेटी व आरमाेरी नगर परिषद व इतर सर्व नगर पंचायतींच्या प्रशासकीय इमारतींसाठी प्रत्येकी दाेन काेटी असे एकून २५ काेटी रुपये नगर विकास विभागातून मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा नियाेजन समितीच्या सभेत दिली. जिल्हा नियाेजन समितीची सभा शुक्रवारी नियाेजन सभागृहात आयाेजित करण्यात आली हाेती. सभेत जिल्हा नियोजनमधील विविध विकासकामांच्या सद्य:स्थितीवर या वेळी आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी या बैठकीत विविध योजनांबाबतची माहिती समिती सदस्यांना दिली. सभेत जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार,  विधान परिषद सदस्य अभिजित वंजारी, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, मुख्य वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर, प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते.या वेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री म्हणाले, आकांक्षित व दुर्गम गडचिरोलीच्या विकासासाठी माझ्याकडील नगरविकास खात्याच्या व इतर सर्व विभागांच्या साहाय्याने प्रयत्न करणार आहे. गडचिराेली जिल्ह्याला इतर जिल्ह्यांबरोबर मुख्य प्रवाहात आणणार असल्याची ग्वाही दिली.३० जानेवारीच्या सभेतील इतिवृत्त वाचून दाखविण्यात आले. झालेल्या कार्यवाहीबाबत या वेळी सर्व सदस्यांनी अनुपालन अहवालाचा आढावा घेतला. तसेच सन २०२०-२१ मधील खर्चाचा तपशील सर्व सदस्यांसमोर सादर करण्यात आला. या वर्षी सन २०२१-२२ करिता मंजूर नियतव्यय ४५४ कोटी बाबतही सदस्यांनी संबंधित विभागाकडून माहिती जाणून घेतली. 

काेराेना काळातही निधीत कपात नाहीकाेराेनाच्या संकटामुळे राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्याच्या विकास निधीत कपात केली आहे. मात्र गडचिराेली जिल्ह्याला विशेष बाब म्हणून निधी कपात करू दिला नाही. गडचिराेली जिल्ह्याला पूर्ण ४५४ काेटी रुपये मंजूर झाले आहेत, अशी माहिती पालकमंत्र्यांनी सभेत दिली.

नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार  नवनिर्वाचित सदस्य राजगोपाल नरसय्या सुल्वावार, अरविंद कात्रटवार, कल्पना तिजारे, ऋतुराज हलगेकर, रवींद्र वासेकर, मो. युनुस शेख, डॉ. नामदेव उसेंडी,  ॲड. रामभाऊ मेश्राम, जीवन नाट यांचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. 

शेती अवजारांसाठी पाच काेटींची तरतूद जिल्हा नियोजनमधून तीन नगर परिषदांना रस्ते, नाले, दिवाबत्ती यांची सोय करण्यासाठी १७.५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.  अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांना शेती अवजारे  खरेदी करण्यासाठी ५ कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. दलित वस्त्यांच्या सुधारणेसाठी २०.४३ कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे.

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAbhijit Wanjariअभिजित वंजारी