शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

राष्ट्रसंतांचे विचार रूजतील तोच सुदिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:02 IST

ग्रामसभेला वनहक्क मिळवून देण्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या आणि आपल्या आगळ्या कार्यशैलीने दिल्लीपर्यंत ओळख निर्माण करणाऱ्या मेंढा-लेखा या गावात रविवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा जागर झाला.

ठळक मुद्देपंधराव्या राष्ट्रसंत तुकडोजी विचार साहित्य संमेलनाच्या निमित्ताने

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ग्रामसभेला वनहक्क मिळवून देण्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या आणि आपल्या आगळ्या कार्यशैलीने दिल्लीपर्यंत ओळख निर्माण करणाऱ्या मेंढा-लेखा या गावात रविवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा जागर झाला. पंधराव्या राष्ट्रसंत तुकडोजी विचार साहित्य संमेलनाच्या निमित्ताने महाराजांनी ५०-६० वर्षांपूर्वी मांडलेले विचार आजही किती शाश्वत आहेत याचा प्रत्यय श्रोत्यांना आला.बडेजावपणाला फाटा देत अगदी साध्या पद्धतीने झालेल्या संमेलनात खऱ्या अर्थाने ग्रामगीतेतील विचार-आचार येथे एकत्रितपणे पहायला मिळाले. मेंढ्यातील गावकऱ्यांसोबत युवा वर्गाने संमेलनाला आवर्जुन लावलेली हजेरी ही बाब कौतुकास्पदच नाही तर भविष्याचे आशादायी चित्र दाखविणारी ठरली. एरवी राष्ट्रसंतांचे भजन, गुरूदेवभक्तांचा कार्यक्रम म्हटले की वृद्धत्वाकडे वळलेली आणि भगव्या टोप्या घातलेली मंडळी नजरेसमोर येते. पण हे संमेलन त्यासाठी अपवाद ठरले. राष्ट्रसंतांच्या विचारांची परंपरा पुढे चालवायची असेल आणि त्यातून उद्याच्या समृद्ध भारताचे स्वप्न पहायचे असेल तर ही धुरा युवकांनीच खांद्यावर घेतली पाहीजे ही संमेलनाचे प्रवर्तक ज्ञानेश्वरदादा रक्षक यांची तळमळ होती. त्यातूनच त्यांनी पहिल्या दिवशी काही महाविद्यालयांमध्ये जाऊन संमेलनाचा येण्याची गळ विद्यार्थ्यांना घातली. संमेलनाची गर्दी वाढविण्यासाठी नाही तर युवा वर्गातील सध्याच्या सर्वात मोठ्या बेरोजगारीच्या समस्येपासून तर इतर अनेक गोष्टींवर राष्ट्रसंतांचे विचार कसे पर्याय ठरू शकतात हे सांगितले. त्यामुळे युवा वर्गही प्रभावित झाल्याचे दिसून आले.‘या भारतात बंधूभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे’ अशा राष्ट्रभक्तीपर भजनांसह गाव, समाज स्वयंपूर्ण व समृद्ध करण्यासाठी गावालाच सर्वाधिकार देण्याची, अर्थात ‘गावगणराज्या’ची संकल्पना तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून मांडली. ती संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी राष्ट्रसंतांचे अनुयायी आणि सहकारी स्व.तुकारामदादा गीताचार्य यांनी आयुष्यभर अविरत लढा दिला. त्या लढ्याची कथा शब्दरूपाने एकत्रितपणे मांडणाºया ‘लढा गावगणराज्याचा’ या पुस्तकाचे प्रकाशनही या संमेलनात झाले. परिसंवादाच्या रूपाने ज्या वक्त्यांनी ‘तुझं गावच नाही का तिर्थ...’ असे म्हणत आपल्या गावावर प्रेम करण्याचा, गावाच्या भल्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांचा आणि त्यातून मिळत असलेल्या समाधानाचा उहापोह या व्यासपीठावरून केला ते राष्ट्रसंतांचे अनुयायीच होते. पण ज्या श्रोत्यांनी या संमेलनाला हजेरी लावली त्यांना राष्ट्रसंतांची नव्याने ओळख झाली यात मात्र शंका नाही. त्यांचे विचार युवा पिढीत रूजतील तोच खºर्या अर्थाने सुदिन म्हणावा लागेल.

टॅग्स :Rashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराज