शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बायोमेट्रिकच्या हजेरीने अडले ग्रामसेवकांचे पगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 00:43 IST

राज्याच्या कोणत्याही ग्रामपंचायतीमध्ये बायोमेट्रिक मशीन कार्यान्वित करून त्यावर ग्रामसेवकाची हजेरी नोंदविण्याबाबत शासनाच्या सूचना नाही. तसेच याबाबत शासनाने नियमही केला नाही. असे असताना सुद्धा गडचिरोली जिल्हा परिषदेच्या वतीने गेल्या सहा महिन्यापासून बायोमेट्रिक मशीन बसवून त्यावर ग्रामसेवकाची उपस्थिती नोंदविल्या जात आहे.

ठळक मुद्देग्रामसेवकांना धक्का : अहवाल न देण्याचा युनियनचा निवेदनातून इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : राज्याच्या कोणत्याही ग्रामपंचायतीमध्ये बायोमेट्रिक मशीन कार्यान्वित करून त्यावर ग्रामसेवकाची हजेरी नोंदविण्याबाबत शासनाच्या सूचना नाही. तसेच याबाबत शासनाने नियमही केला नाही. असे असताना सुद्धा गडचिरोली जिल्हा परिषदेच्या वतीने गेल्या सहा महिन्यापासून बायोमेट्रिक मशीन बसवून त्यावर ग्रामसेवकाची उपस्थिती नोंदविल्या जात आहे. तशी सूचनाही निर्गमित करण्यात आली आहे. सदर निर्णय हा अन्यायकारक असल्याने ग्रामसेवकाचे वेतन बायोमेट्रिक हजेरीच्या आधारावर काढू नये, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन तालुका शाखा धानोराच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात धानोराच्या संवर्ग विकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. बायोमेट्रिक हजेरीच्या आधारावर ग्रामसेवकाचे वेतन काढल्यास कोणत्याही सभेला उपस्थित राहणार नाही, तसेच कोणताही अहवाल देणार नाही, असा इशारा ग्रामसेवक संघटनेने दिला आहे. निवेदन देताना संघटनेचे तालुकाध्यक्ष एस.बी.संतोषवार, जिल्हा कोषाध्यक्ष खुशाल नेवारे, उपाध्यक्ष एस.जी.कुनघाडकर, कार्याध्यक्ष जे.एस.मेश्राम, सचिव एस.के.बोरकर आदींसह ग्रामसेवक उपस्थित होते.तालुक्यासह जिल्ह्यातील ग्रामसेवक आपल्या नियमित कामासोबतच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वाढीव शौचालय बांधकाम, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकूल बांधकाम, पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना, श्रमयोगी मानधन योजना व कर वसुलीची कामे करीत आहेत, असे ग्रामसेवक संघटनेने निवेदनात म्हटले आहे.ग्रामसेवक कर्जाच्या खाईत?ग्रामसेवक संघटनेने निवेदनात नमूद केल्यानुसार, धानोरा तालुक्यातील ९५ टक्के ग्रामसेवकांनी कोणत्या न कोणत्या कारणासाठी बँका व सहकारी सोसायटीकडून कर्ज घेतलेले आहेत. दर महिन्याला मिळणाऱ्या पगारातून बरीच रक्कम कर्ज परतफेडीवर खर्च होत असते. बायोमेट्रिक मशीनवरील हजेरीपटाच्या या अडेतट्टू धोरणामुळे कर्जाचे हप्ते वेळेवर फेडणे आम्हाला शक्य होणार नाही. त्यामुळे प्रशासनाने ग्रामसेवकांना बायोमेट्रिक हजेरीची सक्ती करू नये, असे म्हटले आहे. शासनाचे यासंदर्भात कोणतेही नियम नसताना तसेच ग्रामसेवकांना हजेरीपट नसताना सुद्धा प्रशासनाकडून काही ग्रामसेवकांचे पगार थांबविण्यात आले आहे. बायोमेट्रिक हजेरीची सक्ती करण्यात येऊ नये, अन्यथा निवडणूक आयोगाची कामे वगळता इतर कोणतीही कामे करणार नाही, असा इशारा ग्रामसेवक संघटनेने केला आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत