शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

हत्ती कॅम्पमध्ये झाले ‘सई’चे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 00:09 IST

येथील हत्ती कॅम्पमध्ये राणी नावाच्या हत्तीने एका गोंडस पिलाला मंगळवार १८ डिसेंबर रोजी पहाटेला जन्म दिला. या नवजात मादी पिलाचे नाव ‘सई’ असे ठेवण्यात आले आहे. आता कमलापूर हत्ती कॅम्पमधील हत्तींची संख्या नऊवर पोहोचली आहे.

ठळक मुद्देराणीने दिला मादी पिलाला जन्म : कमलापूरच्या हत्तींची संख्या पोहोचली नऊवर

लोकमत न्यूज नेटवर्ककमलापूर : येथील हत्ती कॅम्पमध्ये राणी नावाच्या हत्तीने एका गोंडस पिलाला मंगळवार १८ डिसेंबर रोजी पहाटेला जन्म दिला. या नवजात मादी पिलाचे नाव ‘सई’ असे ठेवण्यात आले आहे. आता कमलापूर हत्ती कॅम्पमधील हत्तींची संख्या नऊवर पोहोचली आहे. या नव्या पाहुण्याच्या आगमनामुळे हत्ती कॅम्पमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.सदर हत्ती कॅम्पमध्ये आतापर्यंत मंगला, अजित, बसंती, प्रियंका, गणेश, राणी, आदित्य, रूपा हे आठ हत्ती होते. राणीच्या पिलामुळे या संख्येत एकाची भर पडून हत्तींची संख्या आता नऊवर पोहोचली आहे. कमलापूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.एस.एम. खेमलापुरे, गुड्डीगुडम येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.भाऊ राऊत, कमलापूरचे वन परिक्षेत्राधिकारी जी. एम. लांडगे यांच्या देखरेखीखाली प्रसुती प्रक्रिया सुरळीत आटोपली. सई ही सुदृढ व सशक्त असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तिचा जन्म होताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘सई’ असे नाव निश्चित केले आहे.नवीन पिल्लाच्या आगमनामुळे कमलापूर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कमलापूर हत्तीकॅम्प परिसराचा निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीने विकास करावा, यासाठी प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. त्याचा पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती सिरोंचा वन विभागाचे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांनी दिली आहे.पर्यटकांची संख्या वाढणारकमलापूरचा जंगलव्याप्त परिसर डोळ्याचे पारणे फेडणारा आहे. त्यातच हत्ती कॅम्पने यामध्ये आणखी भर टाकली आहे. कमलापूर येथे जाण्यासाठी व्यवस्थित रस्ते नाही. थांबण्याची सुविधा नाही. तरीही दरवर्षी हजारो पर्यटक कमलापूर येथील हत्ती कॅम्पला भेट देऊन निसर्गसौंदर्य न्याहाळतात. सोबतच वन्यजीव असलेल्या हत्तींचेही दर्शन घेतात. नवीन पिलू आपल्या आईच्या मागे धावताना बघणे पर्यटकांसाठी आनंदाची पर्वणी ठरणार आहे. त्यामुळे कमलापूर येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल, अशी अपेक्षा आहे.