शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

शांती मार्च, बंदुका सुपूर्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 00:50 IST

नक्षल्यांच्या शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील काही भागात गुरूवारी नागरिकांनी पोलिसांच्या पुढाकाराने शांती मार्च काढून नक्षल बंदचा निषेध केला.

ठळक मुद्दे पहिला दिवस शांततेत : अतिसंवेदनशील भागात दहशत कायम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नक्षल्यांच्या शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील काही भागात गुरूवारी नागरिकांनी पोलिसांच्या पुढाकाराने शांती मार्च काढून नक्षल बंदचा निषेध केला. तर काही ठिकाणी आणखी भरमार बंदुका पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आल्या. शुक्रवारी सप्ताहाच्या पहिल्या दिवशी कोणतीही हिंसक घटना घडली नसली तरी ग्रामीण भागात दहशतीची छाया दिसत आहे.धानोरा येथे पोलिसांनी जनमैत्री मेळावा घेतला. त्यात विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी नक्षलवाद धुडकावून लावत पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यातूनच शांती मार्च काढण्यात आला. त्यात अनेक नागरिक सहभागी झाले होते. कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत फस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मदत केंद्र मालेवाडा येथील प्रभारी अधिकारी पोउनि अजित कणसे, दुय्यम प्र.अधिकारी दीपक वारे, रामदास जाधव तसेच कर्मचाºयांनी ग्रामभेटी आणि अभियानादरम्यान भरमार बंदुका जमा करण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. त्याला प्रतिसाद देत तळेगाव, खांबाडा (ता.धानोरा) या नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील गावातील ग्रामस्थांनी १ डबल बोअर रायफल, ३ भरमार बंदुका व ३ भरमार बंदुकांचे बॅरल स्वत:हून आणून जमा केले आणि नक्षल शहीद सप्ताहाला विरोध दर्शवला.यापूर्वी मालेवाडा हद्दीतील गावकºयांंनी ६ भरमार बंदुका व ४ भरमार बॅरल जमा केले होते. मालेवाडा हद्दीत ठिकठिकाणी मिळालेल्या नक्षल विरोधी पत्रकांद्वारेही आदिवासी जनतेने आपला निषेध नोंदविला आहे.विशेष म्हणजे नक्षल्यांचे बॅनर जाळणे किंवा त्यांच्या मनसुब्यांना विरोध दशविणारे प्रतिबॅनर लावणे असे प्रकार जिल्ह्यात पहिल्यांदाच घडत आहेत. त्यामुळे नागरिक नक्षल्यांच्या दहशतीच्या जीवनाला कंटाळले असून त्यांना इतरांप्रमाणे भयमुक्त वातावरणात जगायचे आहे, असा अर्थ पोलिसांकडून लावल्या जात आहे.